कडेगाव : आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्याची व उंच भरारी घेण्याची क्षमता आहे. विधिमंडळातील त्यांची कामगिरी अत्यंत प्रभावी आहे. त्यांच्याकडे काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा आहे. गेली ४० वर्षे तुम्ही डॉ. पतंगराव कदम यांना साथ दिली आहे. तशीच साथ विश्वजित कदम यांना कायम ठेवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कडेगाव येथे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते.आमदार कदम यांना राज्याच्या राजकारणात मोठी संधी आहे, डॉ. पतंगराव कदम यांच्या पश्चात हे नेतृत्व तळहाताच्या फोडासारखे जपा, त्यांना विक्रमी मताधिक्य देऊन इतिहास घडवा, असेही चव्हाण म्हणाले.यावेळी आमदार मोहनराव कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार सुमनताई पाटील, मध्य प्रदेशचे आमदार कृणाल चौधरी, कºहाडचे आमदार बाळासाहेब पाटील, युवा नेते राजवर्धन जयंत पाटील, भाऊसाहेब यादव, शांताराम कदम, सौ. स्वप्नाली कदम, डॉ. जितेश कदम, महेंद्र लाड उपस्थित होते.
प्रकाश जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आ. मोहनराव कदम, राजवर्धन पाटील, जितेश कदम, डॉ. अविनाश पाटील, बाळासाहेब पवार, हिम्मत देशमुख, प्रणाली पाटील, सुनील जगदाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, मालन मोहिते, श्वेता बिरनाळे, पी. जी. मुळीक, संभाजी मुळीक, शंकरराव मोहिते-पाटील, ए. डी. पाटील, सर्जेराव पवार, जयदीप यादव, भीमराव मोहिते, मारुती चव्हाण, अॅड. ए. बी. मदने यांनीही मनोगत व्यक्त केले .
डॉ. इंद्रजित मोहिते, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आनंदराव मोहिते, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे मारुतीराव चव्हाण, पृथ्वीराज कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा उपस्थित होते.विकासाचे आदर्श मॉडेल हेच मिशनपलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून साकारणे, हेच पुढील पाच वर्षातील माझे मिशन आहे. यात शेती, नव्या रोजगाराच्या संधी, दर्जेदार शिक्षण, गावोगावी मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार आहे. येथील शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मतदारसंघात निर्माण करणार आहे, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
हिम्मत देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशकडेगाव तालुका भाजपचे माजी अध्यक्ष हिम्मत देशमुख यांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण सुरू असताना हिम्मत देशमुख व्यासपीठावर आले आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.‘करेक्ट कार्यक्रम’ कराआमच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची परंपरा आहे. तसा करेक्ट कार्यक्रम करा. मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासोबत आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी केले.राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद नाकारलेराष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आमदार डॉ. विश्वजित कदम यांना राष्ट्रीय स्तरावरील युवक काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पलूस-कडेगावच्या मातीची सेवा करण्यासाठी त्यांनी ही संधी नाकारली, असे मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कृणाल चौधरी यांनी सांगितले.