शिराळा: येथील विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द येथे संपन्न झालेल्या सांगली जिल्हा युवा महोत्सव २०२३ मध्ये घवघवीत यश संपादन केले. या महोत्सवात महाविद्यालयाला लोकनृत्य व्दितीय, वादविवाद प्रथम, मराठी वक्तृत्व द्वितीय अशी एकूण ३ पारितोषिके प्राप्त झाली असून या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. भगतसिंग नाईक, सचिव विश्वप्रतापसिंग नाईक उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांची निवड ११ ते १३ ऑक्टोबर रोजी दहिवडी ,सातारा येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय युवामहोत्सवासाठी झाली आहे. प्राचार्य डॉ . राजेंद्र बनसोडे, उपप्राचार्य राजसिंग पाटील, उपप्राचार्य भिमराव दशवंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब कांबळे , डॉ. उज्वला बिरजे, तसेच इतर प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यश संपादन केलेले विद्यार्थी पुढीप्रमाणे: लोकनृत्य व्दितीय क्रमांक: दीपलक्ष्मी पाटील, सुप्रिया सातपुते, अभिषेक रोकडे, अक्षता देवकुळे, सलोनी कुंभार, नेहा सुतार, रागिणी वाघमारे, हर्षदा शेणवी, साक्षी पाटीलवाद-विवाद प्रथम क्रमांक: सुफीया नायकवडी, अमृता शिंगटे, मराठी वक्तृत्व व्दितीय क्रमांक: सुफीया नायकवडी
युवा महोत्सवात विश्वासराव नाईक महाविद्यालयाचे घवघवीत यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 11:01 AM