कडेगाव : शिवणी (ता. कडेगाव) येथील प्रगतशील शेतकरी दीपक नथुराम पवार यांच्या शिवारास जर्मनी येथील शेती उद्योजक डॉ. सर हॉलकर यांनी भेट देऊन रेडपॅपरिका या सेंद्रीय मिरचीच्या जातीची पाहणी केली.दीपक पवार यांच्या सेंद्रीय मिरचीला युरोपातील देशांमध्ये चांगली मागणी असल्याचे डॉ. हॉलकर यांनी सांगितले. भारतीय शेतकरी नैसर्गिक संकटाशी सामना करीत खूप परिश्रमाने पिके घेतात.
दीपक पवार यांनी द्राक्षे, पपई, ऊस, झेंडू, मिरची, मका या पिकांचे उत्पन्न घेतले आहे असे सांगून, भारतात होत असलेल्या नवनवीन प्रयोगांचे त्यांनी कौतुक केले. सुशिक्षित तरुणांना शेती क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचेही ते म्हणाले. भारतातील शेतीमालास जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, परंतु रासायनिक खते, तसेच कीटकनाशके वापरून येथील शेतकरी स्वत:चे नुकसान करून घेत आहेत. येथील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकºयांचा शेतीमाल मात्र दर्जेदार असतो, असेही डॉ. हॉल म्हणाले.अमेरिकन शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेट देणाररेडपॅपरिका मिरचीला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ही मिरची खूप तिखट असून, सॉस तयार करण्यासाठी विविध कंपन्या या मिरचीचा वापर करतात. इतर देशांच्या तुलनेत भारतीय शेतीमालाचा सेंद्रीय कर्ब जास्त येतो. त्यामुळे भारतीय शेतीमालाला मागणी वाढत आहे. यामुळेच येथील दीपक पवार यांच्या शेतास पुढील आठवड्यात अमेरिकेतील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेट देणार आहे.
एकरी साडेचार लाख उत्पन्नरेडपॅपरिका मिरची हे सहा महिन्यांचे पीक आहे. एकरी १ लाख ५० हजार रुपये उत्पादन खर्च येतो. सरासरी एकरी २० टन उत्पन्न होते. बाजारभावाप्रमाणे ३० रुपये किलो दराने ६ लाख रुपये उत्पादक शेतकºयाला मिळतात. यामध्ये ४ लाख ५० हजार रुपये नफा मिळतो, असे दीपक पवार यांनी यावेळी सांगितले.