लिंगनूर : आरग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर व वॉटर कुलर देण्यात आले. लिंगनूर (ता. मिरज) येथील व्यावसायिक चंद्रकांत नलवडे यांनी रुग्ण व नातेवाईकांच्या सोयीसाठी ते देऊ केले. म्हैसाळ सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू व वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिकुर्डेकर यांच्याकडे ते सुपुर्द केले. यावेळी उपसरपंच विनोद बुरुड, ग्रामपंचायत सदस्य भानुदास कोकरे, माजी उपसरपंच डॉ. अनिल कोरबू, समुदाय आरोग्याधिकारी डॉ. प्रवीण मोहिते, आरोग्य सेवक मोहन शिरदवाडे, अमोल गुंडवाडे, सारीका शिंदे आदी उपस्थित होते. आरग प्राथमिक आरोग्य केंद्रात आरगसह शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, खटाव, लिंगनूर, बेडग आदी गावांतून रुग्ण येतात. नलवडे यांच्या पुढाकारामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे डॉ. चिकुर्डेकर यांनी सांगितले.
आरग आरोग्य केंद्राला वॉटर कुलरची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:26 AM