विटा : कोरोनात जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेणाऱ्या विटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील आशा वर्कर्सना शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या वतीने मे व जून या महिन्यांचे प्रत्येकी दोन हजार रुपये मानधन देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल साळुंखे यांनी केली.
साळुंखे म्हणाले, आशा सेविकांना शासनाकडून मिळणारे मानधन अल्प असून, तेही वेळेत मिळत नाही. त्यासाठी उद्योजक प्रतापराव साळुंखे यांच्या सूचनेनुसार मे व जून महिन्यांत प्रत्येकी दोन हजारांचे मानधन संस्थेच्या वतीने त्यांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. विटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या आशा वर्कर्सनी शिवप्रताप संस्थेशी संपर्क साधावा.
संस्थेने कोरोना योद्ध्यांना १० हजारांचे सुरक्षा किट, १० हजारांचे मास्क, १० हजारांच्या अर्सेनिक अल्बम गोळ्या, १० हजारांचे सॅनिटायझर बाटल्या तसेच ५०० धान्याचे किट वाटप केले आहे, असेही साळुंखे म्हणाले.
फोटो - २५०५२०२१-विटा-विठ्ठल साळुंखे.