सांगली : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सांगली शहरासह जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे भिलवडी तालुका पलूस येथे मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला याव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत प्रत्येक मतदाराचे आरोग्य तपासणी करून केंद्रावर प्रवेश दिला जात होता. सांगली शहरात अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील काही बुथवर पन्नास टक्के, काही बुथवर ३० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते.भिलवडी येथे मतदान केंद्रावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यकर्त्यांचे केंद्रात सातत्याने ये-जा सुरू होते. पोलिसांनी त्यांना अनेकदा सूचना दिल्या. पण हे कार्यकर्ते ऐकत नव्हते. अखेर केंद्रावरील गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. काही राजकीय कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद मिळाला.
सांगली शहरासह जिल्ह्यात चुरशीने मतदान, भिलवडीत पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 3:15 PM
vidhanparishadelecation, pune, sangli पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सांगली शहरासह जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे भिलवडी तालुका पलूस येथे मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला याव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.
ठळक मुद्देभिलवडीत पोलिसांचा सौम्य लाठीचार्जपदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शांततेने मतदान