शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

‘वाडीभागाई’स केंद्रस्तरीय पुरस्काराचे वेध!

By admin | Published: February 13, 2016 12:15 AM

पंचायत सशक्तीकरण अभियान : १६ फेब्रुवारीस पथकाकडून पाहणी; ग्रामस्थांकडून तयारी पूर्ण

सहदेव खोत-- पुनवत --पंचायत सशक्तीकरण अभियान व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा या दोन्ही अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या वाडीभागाई (ता. शिराळा) ग्रामपंचायतीस आता केंद्रस्तरीय पुरस्काराचे वेध लागले असून, सरपंच रामचंद्र पाटील, ग्रामसेवक बी. एस्. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी या पुरस्कारासाठी कंबर कसली आहे. येत्या १६ फेब्रुवारीस केंद्रस्तरीय पथकाकडून गावाची पाहणी होणार आहे. शिराळा तालुक्यातील वाडीभागाई हे मूठभर लोकसंख्येचे सागाव पट्ट्यातील गाव. मात्र अलीकडच्या काळात गावाने वेगवेगळ्या क्षेत्रात वाढता लौकिक मिळविला आहे. सरपंच रामचंद्र पाटील व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी गावातील युवकांना एकत्रित करुन गावाचा चेहराच बदलला आहे. ग्रामीण भागातील पहिली घंटागाडी या ग्रामपंचायतीने सुरू केली. विधायक कामासाठी महिला ग्रामसभा, ग्रामसभा, कोपरा सभा घेऊन ग्रामपंचायतीने लोकांचे प्रबोधन केले. त्यातून गाव प्लॅस्टिकमुक्त होण्यास मदत झाली. गावाची सांडपाणी, घनकचरा प्रकल्पासाठीही निवड झाली आहे.गाव आदर्शवत करण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वखर्चाने घरोघरी कचराकुंड्या दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणीही कचराकुंड्यांचा वापर होत आहे. आठवडा सुट्टीत आजही गावात सर्व ग्रामस्थांमधून स्वच्छतेचा उपक्रम राबविला जातोय. गावातील सर्व उपक्रमांची दखल घेऊन शासनाने ग्रामपंचायतीस पंचायत सशक्तीकरण व राष्ट्रीय गौरव अभियानामधील राज्यातील प्रथम क्रमांक बहाल केला आहे. दरम्यान, १६ फेबु्रवारीरोजी केंद्रीय पथकाकडून पाहणी होत असून सरपंच रामचंद्र पाटील, उपसरपंच संतोष लुगडे, ग्रामसेवक बी. एस. नागरगोजे, वैशाली पाटील, प्रकाश चव्हाण, मनीषा पाटील, शालन पाटील, शोभा लोहार, आनंदा पाटील यांच्यासह ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. सामाजिक बांधिलकी वाडीभागाई ग्रामस्थांनी आतापर्यंत जळीतग्रस्त, अपघातग्रस्तांना मदत, सामाजिक, सार्वजनिक कामात, तसेच जनहिताच्या कामात पुढाकार घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.‘‘गावाला राज्यपातळीवरील प्रथम क्रमांकाच्या मिळालेल्या पुरस्काराचे सर्व श्रेय ग्रामस्थांना आहे. गावात गट-तट न मानता विधायक कामे केली जात आहेत. देशपातळीवरीलही पुरस्कार निश्चित मिळेल’’ - रामचंद्र पाटील, सरपंच