घशात दुखणे, सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवलेले दिसून येत आहेत. त्याचबरोबर वारणा भागात शेतीला जोडधंदा असणाऱ्या दूध व्यवसाय केला जातो. पाण्याची दुर्गंधी येत असल्यामुळे जनावरे मुबलक प्रमाणात पाणी पित नाहीत. याचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे. दूषित पाणी झाल्यामुळे नागरिक सतर्क झाले आहेत. पाणी विकत घेऊन पिण्यास वापरत आहेत. पाण्यात रसायन सोडल्याच्या घटनेचा नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
कोट
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे वारणा नदीवर प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे फोटोसहित तक्रारीचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांना दिले आहे. त्या तक्रार अर्जाचा तात्काळ विचार करून रसायन सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.
- उत्तम गावडे
सरपंच, शिगाव
चाैकट
मासेमारीचा संशय
पाण्यात रसायन टाकून मासे मारले जातात आणि यानंतर त्यांची विक्री केली जाते, असा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. यामुळे अशा घटना घडत असतील, तर त्यावर लक्ष ठेवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.