जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, राज्यातील काही भागांत कोरोना रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात योग्य त्या खबरदारी घेण्यात येत आहेत. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. याशिवाय चाचणीचीही संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्व रुग्णालये व तेथील साधनांचाही आढावा घेण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. हे चिंतनीय असून विवाह समारंभासह इतर ठिकाणी गर्दी करू नयेत. यासाठी गुरुवारी मंगल कार्यालय चालकांसह इतर हॉलच्या व्यक्तींचीही बैठक घेण्यात येणार आहे.
चौकट
सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर याबाबत कडक पालन सुरू करण्यात आले आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. बुधवारपासूनच त्यांनी कारवाईही सुरू केली असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.