लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नागपूरची संत्री, सांगलीची द्राक्षे, रत्नागिरीचा हापूस अन् वसईची केळी साताऱ्याच्या बाजारपेठेत नेहमीच पहायला मिळतात. या फळांबरोबरच काश्मिरच्या सफरचंदाची आवकही मोठ्या प्रमाणात होते. सध्या काश्मिरमधील फळांचा हंगाम सुरू न झाल्याचे दक्षिण आफ्रिका, वॉशिंग्टन, न्यूजीलंड अन् चिली या देशातील सफरचंद साताऱ्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले असून सातारकरांना परदेशी फळांची गोडी चाखायला मिळत आहे.येथील बाजारपेठेत हंगामानुसार वेगवेगळ्या फळांची आवक नेहमीच होत असते. केळी, चिकू, आंबा, मोसंबी, संत्री, कलिंगड या फळांना नागरिकांमधून दरवर्षी मागणी असते. त्याचप्र्रमाणे सफरचंदालाही सर्वाधिक मागणी होत असते. बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होणारे सफरचंद हे प्रामुख्याने काश्मिरहून आणले जातात. मात्र, सध्या काश्मिरमधील फळांचा हंगाम सुरू न झाल्याने बाजारपेठेत परदेशी सफरचंद विक्रीसाठी दाखल झाले आहे.सध्या दक्षिण आफ्रिका, वॉशिंग्टन, न्यूजीलंड अन् चिली या देशातील सफरचंद बाजारपेठेत पहावयास मिळत आहेत. चिली आणि दक्षिण आफ्रिकेतील फळांची आवक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झाली असून नागरिकांना विदेशी फळांची गोडी चाखायला मिळत आहे. आॅगस्ट महिन्यात काश्मिरमधील फळांचा हंगाम सुरू झाल्यानंतर परदेशी फळांची आवक कमी होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मुंबईहून आवकदक्षिण आफ्रिका, वाशिंग्टन, न्यूजीलंड व चिलीहून ही फळे सर्वप्रथम मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होतात. यानंतर व्यापाऱ्यांकडून ती विक्रीसाठी खरेदी केली जातात. सातारा शहरात दिवसाला जवळपास ५० ते ६० कॅरेट सफरचंदाची विक्री केली जाते. एका कॅरेटमध्ये सरासरी अठरा किलो फळे असतात. म्हणजेच सुमारे १ हजार किलो परदेशी सरफरचंदाची विक्री एकट्या सातारा शहरातून होते. ही आहेत वैशिष्ट्यकाश्मिर अन् विदेशाहून येणाऱ्या फळांच्या रंगामध्ये मोठा फरक आहे. या दोन्ही फळांची चव वेगवेगळी आहे. विदेशी फळे तांबड्या, केसरी रंगाची असून त्यावर विशीष्ट अशी चकाकी असते. याची चव आंबट गोड असते. तर काश्मिरची फळे लालसर रंगाची असून ती गोड असतात.
वॉशिंग्टन, चीलीतील सफरचंदाची सातारकर चाखतायत गोडी
By admin | Published: July 12, 2017 12:04 AM