दिलीप मोहिते/विटा : महावितरणने विटा शहरात दररोज सरासरी साडेतीन तास वीजभारनियमन निश्चित केले असून, या भारनियमनाचा सर्वाधिक फटकावस्त्रोद्योगाला बसणार आहे. या साडेतीन तासांच्या भारनियमनात शहरातील६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार असून, सुमारे२० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे.दरम्यान, याचा फटका यंत्रमागावर काम करणाºया कामगारांनाही सोसावा लागणारअसून, शहरातील दोन हजार कामगारांची प्रतिदिन ७५ हजार रुपये मजुरी बुडणारआहे. त्यामुळे या वीज भारनियमनामुळे यंत्रमागधारक संतप्त झाले आहेत.विटा शहरात वस्त्रोद्योग यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेमहावितरणने चार फिडर तयार केले आहेत. त्यातील दोन फिडर ए ग्रुपला, तरदुसरे दोन फिडर बी ग्रुपला जोडले आहेत. त्यातील ए ग्रुपला सव्वातीन तासआणि बी ग्रुपला ४ तास वीज भारनियमन निश्चित केल्याने सरासरी भारनियमनसाडेतीन तासाचे समजण्यात येत आहे.
विट्यात सहा हजार यंत्रमागधारक सव्वातीन तासात सरासरी १२ मीटर कापड तयारकरतात. त्यामुळे सव्वातीन तासाच्या कालावधित सुमारे ७५ हजार मीटरकापडाच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे. दरम्यान, या यंत्रमागावर कामकरणाºया कामगारांची संख्या दोन हजाराच्या आपपास आहे. त्यामुळेकामगारांनाही भारनियमनाचा फटका बसला असून, दररोज ७५ हजार रुपयांच्यामजुरीला मुकावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या या भारनियमनामुळेसर्वसामान्य व वस्त्रोद्योग व्यावसायिकांत संतापाची लाट उसळली आहे.
प्रश्नाला वाचा फोडणार : किरण तारळेकरमहावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे भारनियमन करावे लागत आहे. कोळसासंपल्याचे सांगून महावितरण स्वत:चे हसू करून घेऊ लागले आहे. शेतकरी,उद्योजक व सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली जाईल.भविष्यात सर्वच ग्राहकांना पुरेशा दाबाने वीज मिळाली पाहिजे, असे मत विटायंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केले.