जत : जत तालुका पंचायत समितीतील १८ मतदार संघांची बुधवारी येथील तलाठी हॉलमध्ये प्रांताधिकारी अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी तहसीलदार अभिजित पाटील व पंचायत समिती गटविकास अधिकारी डी. आर. मडके उपस्थित होते.या नवीन आरक्षण सोडतीमुळे विद्यमान पंचायत समितीमधील एकाही सदस्याला परत संधी मिळणार नाही. याशिवाय अठरापैकी बारा गणातील इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे, तर सहा मतदारसंघ सर्वसाधारण झाले आहेत. त्यामुळे तेथे इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. तेथील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.माडग्याळ पंचायत समिती मतदार संघ अनुसूचित जाती (पुरुष) राखीव झाला आहे. त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार सरदार पाटील, विठ्ठल निकम, सोमाण्णा हक्के, कृष्णदेव गायकवाड यांना संधी मिळणार नाही. जाडरबोबलाद मतदार संघ अनुसूचित जाती (स्त्री) राखीव झाला आहे. त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार महादेव अंकलगी, तम्मणगौडा रवी बसवराज बिराजदार, संतोष पाटील, भीमराया बिराजदार यांना संधी मिळणार नाही.खोजानवाडी, दरीबडची, संख हे तीन मतदार संघ ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) स्त्री गटासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार मारुती पवार, रामगोंडा संती, आनंदराव पाटील, पिराप्पा माळी, साहेबराव टोणे, आर. के. पाटील, सुभाष पाटील, दयगोंडा बिराजदार यांना संधी मिळणार नाही.गिरगाव व बिळूर हे दोन मतदार संघ ओबीसी पुरुष गटासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे येथील इच्छुक उमेदवार दादासाहेब माने, बिळयानी बिराजदार, हणमंत दुधगी, पी. एम. पाटील, अॅड. बी. ए. धोडमणी यांना संधी मिळणार नाही.येळवी, मुचंडी, उमराणी, कोसारी, उमदी हे पाच मतदार संघ सर्वसाधारण स्त्री राखीव झाले आहेत. त्यामुळे प्रकाश जमदाडे, आर. के. माने, सुनील पवार, रमेश पाटील, आप्पू बिराजदार, सतीश चव्हाण, अॅड. एम. के. पुजारी, मल्लेश कत्ती, आप्पासाहेब नामद, शिवू तावशी, प्रकाश भोगले, नाथा पाटील, प्रभाकर जाधव, माणिक वाघमोडे, संजय सावंत, सुनील पोतदार आदी इच्छुक उमेदवारांना येथून संधी मिळणार नाही. शेगाव, डफळापूर, तिकोंडी, करजगी, बनाळी, बाज हे मतदार संघ सर्वसाधारण पुरुष राखीव झाले आहेत. त्यामुळे लक्ष्मण बोराडे, रवी पाटील, महादेव साळुंखे, एन. डी. शिंदे, भीमराव शिंदे, मन्सूर खतीब, अभिजित चव्हाण, जे. के. माळी, सज्जन चव्हाण, मनोज जगताप, सुभाष गोब्बी, रमेश जगताप, मधुकर शिंदे, रवींद्र सावंत, प्रमोद सावंत, बाबासाहेब कोडग, विलास पाटील, आप्पा मासाळ, अरविंद गडदे, शंकर वगरे, कुंडलिक दुधाळ यांना या मतदार संघातून संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे चुरस निर्माण होऊन येथील निवडणूक लक्षवेधी राहणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. (वार्ताहर)
विद्यमान सदस्यांच्या अपेक्षांवर पाणी
By admin | Published: October 06, 2016 12:51 AM