सांगली : पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे. पाण्याच्या शाश्वत विकासासाठी भूजल साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर अनर्थ अटळ आहे. विशेषतः भूजल पातळीत घट होणे सर्वच अर्थाने हानिकारक आहे. त्यादृष्टीने काळजी घ्यावी लागेल, असे मत वरिष्ठ भूजल वैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी व्यक्त केले.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय भूगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भूजल साक्षरता या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे उद्घाटन वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते.भूजल साक्षरता काळाची गरज या विषयावर बोलताना ऋषिराज गोसकी म्हणाले, पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब आपण ठेवत नाही हीच खरी मोठी अडचण आहे. पाण्याच्या बाबतीत आपण आपण गांभीर्याने विचार करीत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भूजल सर्वेक्षण व साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेची तरुणाई खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे हे नक्कीच आशादायी चित्र आहे. सर्वांनीच पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर फार मोठ्या अनर्थाला तोंड द्यावे लागणार आहे.प्राचार्य. डॉ. डी. जी. कणसे म्हणाले, मानवी जीवन हे नैसर्गिक साधनसामुग्रीवर अवलंबून आहे याचा आपणास विसर पडू लागल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषतः इथून पुढच्या काळात भुजलचा प्रश्न गांभीर्याने सोडविला पाहिजे. त्यासाठी देशातील तरुणाई व ग्रामस्थ यांनी अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने शाश्वत विकास होणार नाही.उपस्थितांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विकास आवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रूपाली कांबळे यांनी केले. आभार डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, भूगोल विषयाचे प्राध्यापक, महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमूख प्रा. डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमूख प्रा. तानाजी सावंत व्यवसायिक विभाग प्रमूख डॉ. आनंदा सपकाळ, कनिष्ठ विभागाचे प्रमूख प्रा.ए.एल. जाधव त्याचबरोबर विविध शाखांचे विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले.
पाण्याचे व्यवस्थापन आणि हिशोब गरजेचा : ऋषिराज गोसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 10:41 AM
environment water scarcity Sangli : पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे. पाण्याच्या शाश्वत विकासासाठी भूजल साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर अनर्थ अटळ आहे. विशेषतः भूजल पातळीत घट होणे सर्वच अर्थाने हानिकारक आहे. त्यादृष्टीने काळजी घ्यावी लागेल, असे मत वरिष्ठ भूजल वैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देपाण्याचे व्यवस्थापन आणि हिशोब गरजेचा : ऋषिराज गोसकीभूजल साक्षरता या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचे उद्घाटन