जत : भाजपमध्ये आला तरच पाणी देतो, असे म्हणून राजकारणासाठी पाणी अडविण्याचे पाप ज्यांनी केले, त्यांना जनता माफ करणार नाही. त्यामुळे स्वाभिमानीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला.लोकसभा निवडणूक प्रचारासाठी डफळापूर (ता. जत) येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जत तालुक्यातील दुसऱ्या दिवशीच्या दौºयाचा प्रारंभ धावडवाडी येथून झाला. हिवरे, अंकले, बाज, बेळुंखी, डफळापूर, कुडणूर, शिंगणापूर, मिरवाड, जिरग्याळ, एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, बसर्गी, सिंदूर, उमराणी, खोजानवाडी, बिळूर, येळदरी या गावांचा दौरा होता.यावेळी सुरेश शिंदे, विक्रम सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील, आप्पाराया बिराजदार, चंदूलाल शेख, महादेव पाटील, जी. के. माळी, शंकरराव गायकवाड, बी. आर. पाटील, भारत गायकवाड, हुसेन आत्तार, अजित भोसले, अब्दुल मकानदार, पोपट शिंदे, भानुदास गडदे, मनोहर भोसले, अजितराव गायकवाड, दिलावर शेख प्रचार दौºयात सहभागी झाले होते.विशाल पाटील म्हणाले, प्रतीक पाटील यांनी डफळापूरच्या बोकडतोंडी तलावात पाणी आणले होते. वसंतदादांनी म्हैसाळ प्रकल्प उभा केला. ते असते तर वीस वर्षांपूर्वीच जतला पाणी मिळाले असते.ते म्हणाले, सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जायला भाजपवाले मागे- पुढे बघत नाहीत. लोकांमध्ये भांडणे लावायची, फूट पाडायची, हे त्यांचे राजकारण आहे. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण असे अनेक विषय अर्धवट राहिले आहेत. वर्षाला दोन कोटी नोकºया देतो, असे सांगणाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत एकही नोकरी दिलेली नाही. न्याय योजनेतून गरीब कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हे पैसे थेट नागरिकांच्या खात्यात जमा होणार आहेत.त्यांनी आणले किती?प्रतीक पाटील यांनी एक हजार कोटींचा निधी आणला; पण ते कधीही कुठल्याही उद्घाटनास गेले नाहीत. पण यांनी मात्र फक्त ७४ कोटी आणले आणि ७४ कोटी नारळ फोडले. जर भाजपमध्ये येणार असाल, तरच पाणी सोडतो, असे सांगत जत तालुक्यात संजय पाटील यांनी आजवर केवळ पाण्याचे राजकारणच केले. जत तालुक्यास पाणी मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
Lok Sabha Election पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना माफी मिळणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:28 PM