सांगली : महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या पूर नियंत्रण बैठकीमध्ये अलमट्टी धरणामध्ये जुलैत ५१७.५० मीटर पाणी पातळी ठेवण्याचे धोरण निश्चित झाले होते, तरीही २९ जुलैरोजी अलमट्टीत एक मीटरने जास्त म्हणजे ५१८.५० मीटर पातळी आहे. ती कमी करण्याची विनंती महाराष्ट्र शासनाने कर्नाटक जलसंपदा विभागाच्यास केली आहे. त्यानुसार त्यांनी ती कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अलमट्टीत जुलै महिन्यात ५१७.५० मीटरपेक्षा जास्त पाणी पातळी असू नये, असे ठरले होते. २९ जुलैरोजी ५१८.५० मीटर पाणी पातळी असून, धरणात ८५.४५ टक्के पाणीसाठा आहे. आजही कृष्णा खोऱ्यातील धरण क्षेत्रातील अतिवृष्टी होण्याचा धोका संपलेला नाही. १५ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणात ५१७.५० मीटरपेक्षा जास्त पाणीपातळी ठेवू नये, अशी विनंती महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने अलमट्टी धरण व्यवस्थापनाकडे केली आहे.त्यानुसार अलमट्टी येथील अधिकाऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन हळूहळू धरणातील पाणी पातळी कमी करून ५१८ पर्यंत ठेवण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राच्या जलसंपदा अधिकाऱ्यांना दिले आहे.
कोयनेतील सध्या पाणीसाठा योग्यच : नितीश पोतदारधरणक्षेत्रातील ३० वर्षांच्या पावसाचा अभ्यास करून कुठल्या महिन्यात किती पाणी सोडायचे, याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर जलसंपदा आणि केंद्रीय जल आयोगाची मंजुरी घेतली जाते. धरणातील पाणी साठ्याचे जून ते १५ ऑक्टोबरपर्यंतचे नियोजन केले असून, या नियमांचे कोयना धरणात तंतोतंत पालन केले आहे. यामुळे पुरापासून तर संरक्षण करता आलेच, शिवाय वीज निर्मितीसाठीही फायदा झाला आहे. सध्याचा कोयना धरणातील पाणीसाठा योग्य आहे, अशी माहिती कोयना धरण क्षेत्राचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी दिली.
कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आमचा संपर्क झाला आहे. तेथील अधिकाऱ्यांना अलमट्टी धरणामध्ये ५१८.५० मीटर पाणीपातळी ठेवली आहे. सध्याची पाणीपातळी एक मीटरने जास्त असल्यामुळे ५१७.५० मीटरच ठेवावी, अशी सूचना केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना मान्य केली असून, त्यांनी विसर्ग वाढवून पाणी पातळी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. -मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, सांगली जलसंपदा विभाग.
धरणातील पाणीसाठाधरण - क्षमता - सध्याचा साठा - टक्केवारीअलमट्टी - १२३.०८ - १०५.१२० - ८५.४५कोयना - १०५.२५ - ६४.८३ - ६२वारणा - ३४.४० - २६.९३ - ७९