शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

सांगली जिल्ह्यात दीड लाख लोकांना ६० टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:41 PM

सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून ७० गावांसह ४६६ ...

सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून ७० गावांसह ४६६ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४२ हजार लोकसंख्येला ६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मार्चअखेर १६९ टँकर सुरु करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाराटंचाई भीषण असली तरी, छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी सवलती, सुविधांकडेही कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील बहुतांशी भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणी टंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पाण्याअभावी हाता-तोंडाला आलेली पिकेही वाया जात आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. पन्नासपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांत तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यांतील २४६ गावांचा समावेश आहे. अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. दुष्काळी स्थिती गंभीर होत असल्याने शासनाकडून याची दखल घेण्यात आली होती. दुष्काळसदृश आटपाडी तालुक्यात सर्वात कमी ३१ टक्के पाऊस झाला. जतमध्ये ५६.७५ टक्के, कवठेमहांकाळ ६५.८६, खानापूर ८०.१४, तासगाव ५४.७०, पलूस ९२.२६ आणि कडेगाव तालुक्यात १०६.२३ टक्के पावसाची सरासरी आहे. मिरज पूर्व भागाला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत.पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने टँकर सुरु करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या ७० गावे, ४६६ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४२ हजार लोकसंख्येला ६० टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. जत तालुक्यातील ३० गावांना ३२ टँकरने, आटपाडीतील २२ गावांना १६ टँकरने, खानापूरच्या सहा गावांना पाच टँकरने, तासगावमधील तीन गावांना एका टँकरने, तर कवठेमहांकाळमधील नऊ गावांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे.पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खासगी ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मार्चअखेर १६९ टँकर सुरु करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम भागातून उसाचे वाडे मागवले जात आहे, परंतु ते जादा दराने खरेदी करुन जनावरांना जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरु होणार का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.महावितरणकडून शेतकºयांची अडवणूकदुष्काळी गावातील शेती पंपांची वीज खंडित केली जाणार नाही; मात्र अनेक ठिकाणी रोहित्र दुरुस्तीसाठी बिल भरल्याशिवाय महावितरण तिकडे फिरकतच नसल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या सहा महिन्यांपासून नव्याने एकाही शेतकºयाचा विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला नाही.