शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

Sangli News: कृष्णेतील पाणी उपसा बंदी येत्या सोमवारपर्यंत कायम, पाटबंधारे विभागाचा निर्णय 

By अशोक डोंबाळे | Published: June 17, 2023 7:11 PM

सांगली, मिरजेतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सांगली : कोयना धरणात ११.५३ टीएमसी तर वारणा धरणात ११.१८ टीएमसी पाणीसाठा आहे. पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच कृष्णा नदीमधून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या सर्व योजनांसाठी दि. १८ व १९ जूनपर्यंत उपसा बंदी आदेश सांगली पाटबंधारे विभागामार्फत लागू केला आहे. दि. २० ते २२ जून कालावधीत उपसा कालावधी असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी जाहीर केले.सांगली पाटबंधारे मंडळच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी कोयना धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून कृष्णा नदीतून दि. १४ ते १७ जून या चार दिवसांसाठी उपसाबंदी आदेश लागू केला होता. परंतु कृष्णा नदीतील साटपेवाडी बंधाऱ्यावर ताकारी सिंचन योजनेसाठी पाणीसाठा केला होता. ताकारी योजना बंद केल्यामुळे साटपेवाडी बंधाऱ्यातून पाणी सोडून तीन दिवस झाले तरीही कृष्णा नदीचे पाणी सांगलीपर्यंत येऊ शकले नाही. शनिवारी पद्माळे (ता. मिरज) येथे कृष्णा नदीतील पाणी आले असून रविवारी सांगलीत येणार आहे.कृष्णा नदीतील पाणी पुढे गतीने सरत नसल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. १८ आणि १९ जूनपर्यंत उपसा बंदी आदेश वाढविला आहे. दि. २० ते २२ या तीन दिवसांत शेतीला पाणी उपसा करण्यासाठी परवानगी दिली आहे.पाणी, वीजपुरवठा रद्द करणारउपसा बंदी कालावधीमध्ये पिण्याचे पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर कारणांसाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून संबंधितांचा पाणी परवाना व विद्युतपुरवठा रद्द करण्यात येणार आहे. उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कार्यकारी अभियंता देवकर यांनी दिला आहे. धरणातील मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करून सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडल्यास कठोर कारवाईचाही त्यांनी इशारा दिला आहे.

टेंभू योजना बंद, ५०० क्युसेकने पाण्याला गती मिळेलटेंभू उपसा सिंचन योजनेचे दहा ते बारा पंप चालू होते. या पंपाद्वारे जळवास ५०० क्युसेक पाणी उपसा होत होता. पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेंभू योजना शनिवारी बंद केली आहे. यामुळे कृष्णा नदीत ५०० क्युसेकच्या पाण्यास गती मिळणार आहे. यामुळे कृष्णा नदीतील पाणी प्रवाहित राहण्यास मदत होईल, असेही कार्यकारी अभियंता ज्योती देवकर म्हणाल्या.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीriverनदी