शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

Sangli news: म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचा पाणीउपसा थांबवला, शेतकरी चिंतेत

By संतोष भिसे | Published: July 03, 2023 2:12 PM

पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात

सांगली : म्हैसाळ प्रकल्पातून गेले पाच महिने सुरु असलेला पाणीउपसा अखेर थांबविण्यात आला. कोयना धरणात आणि कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने पंप बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.गेल्या महिन्याभरापासून कृष्णेत पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. सध्या पाणी आले असले, तरी ते पिण्यापुरतेच आहे. त्यामुळे सिंचनासाठीच्या उपशावर पाटबंधारे विभागाने काहीवेळा निर्बंध लादले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठपुराव्यानंतर उपसाबंदी उठवण्यात आली, पण नदीत पाणीच नसल्याने म्हैसाळ प्रकल्पाचे पंप बंद करावे लागले. कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या मिरज, कवठेमहांकाळ किंवा तासगाव तालुक्यातून पाण्याची मागणी नव्हती. जतमध्ये पाणीपुरवठा सुरु होता, पण नदीत पाणी नसल्याने उपशावर मर्यादा येत होत्या. पहिल्या तीन पंपगृहांमध्ये दोन किंवा तीनच पंप सुरु ठेवता येत होते. जतला पाणी देण्यासाठी पहिल्या दोन पंपगृहांत १५ ते १८ पंप सुरु ठेवणे आवश्यक ठरते. पण नदीत पाणी नसल्याने पंपांची संख्या वाढवता आली नाही. परिणाम चार दिवसांपूर्वी उपसा पूर्णत: बंद करण्यात आला.सध्या प्रकल्पाचा मुख्य कालवा कोरडा पडला आहे. या चारही तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. तलाव, ओढे-नाले कोरडेच आहेत. या स्थितीत प्रकल्पाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना आधार मिळत होता.

पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात२० जानेवारीरोजी उपसा सुरु केला होता. तब्बल पाच महिने आवर्तन सुरु राहिले. आता जानेवारीमध्ये पुढील आवर्तन सुरु होण्याची शक्यता आहे. पण धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यास पुराचे संकट टाळण्यासाठी ऐन पावसाळ्यात उपसा पुन्हा सुरु केला जाऊ शकतो. हे पाणी दुष्काळी पट्ट्याला पुरवले जाईल.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी