सांगली : कृष्णा नदीवरीलसांगलीचा बंधारा पाडण्याचा निर्णय रद्द झाल्याने उन्हाळ्यात शहराला पाणीपुरवठा होऊ शकला. नुकतेच नदीपात्रात कोयनेतील पाणी दाखल झाले. या पाण्याचे विविध सामाजिक संघटनाच्यावतीने पूजन करण्यात आले.
महाआघाडीच्या काळात सांगली बंधारा पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा बंधारा पाडू नये, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मानवी साखळी करीत विरोध केला होता. जून महिन्यात पावसाने ओढ दिली. कोयना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने कृष्णा नदीही कोरडी पडली होती. परिणामी, सांगली, कुपवाडचा पाणीपुरवठा प्रभावित झाला. उपनगरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. बंधारा पाडू नये, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. जलसपंदा विभागाकडून हा निर्णय रद्द करण्यात आला.
त्यानंतर कोयना धरणातून सोडलेले पाणी सांगलीत दाखल झाले. या पाण्याचे पूजन रविवारी करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, नगरसेवक शेखर इनामदार, संजय चव्हाण, मोहन चोरमुले, रविंद्र जोशी, डॉ. चव्हाण, गोपाळ मर्दा, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, बटूदादा बावडेकर, गोपाळ पवार, रेखा पाटील आदिसह नागरिक उपस्थित होते.