शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

घाटमाथ्यावर बागा नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:22 PM

जालिंदर शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी ...

जालिंदर शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी टॅँकरने पाणी आणून द्राक्षबागा जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही शेतकऱ्यांवर पाण्याविना बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे. सध्या बºयाच बागांचे पाण्याविना केवळ सांगाडेच शिल्लक राहिल्याचे चित्र दिसत आहे.दुष्काळाने तलाव, ओढे, विहिरी, नाले, बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. कुची वगळता या पट्ट्यात कोठेही जलसिंचन योजनेचे पाणी आले नाही. घाटमाथ्याला वरदान ठरणाºया टेंभू योजनेंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेनेही मंद रूप धारण केले आहे. बळीराजाने आजअखेर कशाबशा बागा जगविल्या. त्यासाठी मोठा कर्जाचा डोंगरही उभा केला. या पट्ट्यातील सर्व शेती ही पावसावर अवलंबून असून, यावर्षी तर वरुणराजाने पाठ फिरविल्याने आजअखेर कोणताही जलस्रोत या भागात उपलब्ध झालेला नाही.सध्या या परिसरात सुमारे ४०० एकर द्राक्ष शेतीची नोंद आहे. तीही हळूहळू घटू लागली आहे. अनेकांनी बागा सोडून दिल्या आहेत. बºयाचजणांनी या बागांवर कुºहाड चालवली आहे; तर काही सधन शेतकरी बागा जतन करण्यासाठी टॅँकरच्या पाण्याचा आधार घेत आहेत. टॅँकरच्या पाण्यासाठी कुठलेही अनुदान अथवा सवलत दिली जात नाही. त्याची संपूर्ण तरतूद शेतकºयालाच करावी लागते. त्यामुळे त्याला यासाठी आता आर्थिक कसरत करावी लागत आहे.घाटनांद्रेत चारा छावणीची मागणीसततच्या दुष्काळाने, त्यातच यावर्षी वरुणराजाने अगदीच पाठ फिरविल्याने घाटमाथ्यावर भीषण टंचाई निर्माण झाली असून, नैसर्गिक चाराच निर्माण न झाल्याने व खरीप व रब्बी पेरा वाया गेल्याने चारा टंचाई जाणवू लागली आहे. या भागात चारा छावणी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, वाघोली, जाखापूर व कुची परिसरात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यातच पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनावरे जतन करणे बळीराजाला कसरतीचे ठरत आहे. प्रत्येक गावाने ग्रामसभेत ठराव घेऊन तीन-चार महिन्यांपूर्वीच चारा छावणीचे प्रस्ताव दिले आहेत. ते शासनदरबारी धूळ खात आहेत. शासनाने तर मागेल त्या ठिकाणी चारा छावणी देण्याचे आदेश दिल्याने, या पट्ट्यात तात्काळ चारा छावणी सुरू करण्याची मागणी बळीराजा करत आहे.