सांगली : वृध्द साहित्यिक व कलाकारांचे सन 2020-21 साठीच्या मानधन मागणीसाठी जिल्ह्यातून 275 अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची छाननी करून शासन निर्णयानुसार 100 अर्जांना मान्यता देण्यात येणार आहे. या मानधन योजनेचा लाभ देण्यासाठी अर्जांची छाननी पारदर्शक करून पात्र वृध्द साहित्यिक कलाकारांना लाभ दिला जाईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी आयोजित बैठकीत सांगितले.जिल्हास्तरीय वृध्द कलाकार मानधन समितीच्या प्रस्ताव पडताळणी बैठकीत ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, नवनिर्वाचित उपाध्यक्ष अविनाश कुदळे, समिती सदस्य अनंत सपकाळ, अरूण पळसुले, गजेंद्र माने, चंद्रकांत मैगुरे, सागर मलगुंडे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सदस्या सुनिता आसवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार आदि मान्यवर उपस्थित होते.श्री. गुडेवार म्हणाले, कोरोनामुळे वृध्द साहित्यिक व कलाकार यांची बिकट अवस्था झाली आहे. अशा कलाकारांना शासनाची मदत म्हणून ह्यअह्ण वर्गातील कलाकार व साहित्यिकांना 3 हजार 150, ह्यबह्ण वर्ग 2 हजार 700 तर ह्यकह्ण वर्ग साठी 2 हजार 250 रूपये दरमहा मानधन दिले जाते. सांगली जिल्ह्यामध्ये ह्यअह्ण वर्गात 17 ह्यबह्ण वर्ग 115 तर ह्यकह्ण वर्गात 2 हजार 255 अशा एकूण 2 हजार 387 कलाकार व साहित्यिकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात प्रतिवर्षी 100 साहित्यिक व कलाकारांना मानधन देण्याचे शासनाचे धोरण आहे. तसेच यामध्ये 20 टक्के महिलांचा समावेश असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक साहित्यिक कलाकारांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार परिपूर्ण अर्ज समितीकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी. शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.समितीचे अध्यक्ष महादेव पाटील यावेळी म्हणाले, कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज सादर करण्यासाठी येणे ही जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे साहित्यिक व कलाकारांचे अर्ज प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समिती स्तरावर स्विकारण्याची व्यवस्था करण्यात यावी.
ज्या कलाकारांचे कोरोना परिस्थितीमुळे मानधन थकलेले आहे, त्यांचे मानधन त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. सद्यस्थितीत तमाशा कलावंत अत्यंत अडचणीत असून या कलावंतांना शासनाची आर्थिक मदत मिळावी यासाठीही समितीमार्फत कार्यवाही व्हावी. यामुळे जास्तीत जास्त साहित्यिक व कलाकारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली