वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील जुगाई मंदिर ते मांगरूळकडे जाणाऱ्या रस्त्याची आमदार मानसिंगराव नाईक यांनी पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील जुगाई मंदिर ते मांगरूळकडे जाणारा चार किलोमीटरचा रस्ता आगामी वर्षभरात पूर्ण करू, असे आश्वासन आमदार मानसिंगराव नाईक यांनी वाकुर्डे खुर्द व मांगरूळच्या ग्रामस्थांना दिले. वाकुर्डे खुर्द येथील जुगाई मंदिरजवळ दोन्ही गावच्या ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
प्रारंभी आमदार नाईक यांनी रस्त्याची पाहणी केली. वाकुर्डे खुर्द ग्रामस्थांनी गावापासून ५०० मीटर व मांगरूळ ग्रामस्थांनी एक किलोमीटर मुरुमीकरणाचे काम लोकसहभागातून केल्याची पाहणी केली. या कामासाठी स्थानिक विकास निधीतून नऊ लाख दिले आहेत. आगामी वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण करून तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागास जोडू, असे आमदार नाईक यांनी सांगितले.
यावेळी 'विश्वास'चे संचालक डॉ. राजाराम पाटील, साधना पाटील, उपसरपंच नंदाताई जाधव, सोसायटी अध्यक्ष तानाजी पाटील, युवराज जाधव, दीपक जाधव, आकाराम जाधव, यशवंत जाधव, संजय जाधव, विजय जाधव, हणमंत पाटील, अण्णा पाटील, आनंदराव सवादकर, आगद खांडेकर, विजय पाटील, दिलीप शेणवी, आदी उपस्थित होते.