सांगली : जिल्हा परिषद आवारात बसविल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात चर्चेसाठी बैठक होणार आहे. बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या दालनात पुतळा समितीच्या सदस्यांची बैठक होईल. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ध्वजकट्ट्याशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे नियोजन आहे. सर्वसाधारण सभेने त्याला मान्यताही दिली आहे. पुतळ्याची रुपरेषा बुधवारच्या बैठकीत निश्चित होईल. पुतळा समितीच्या अध्यक्षपदी स्वत: अध्यक्षा आहेत. अन्य सदस्यांमध्ये उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संग्रामसिंह देशमुख, अश्विनी पाटील, शोभा कांबळे, निजाम मुलाणी, बांधकामचे कार्यकारी व उपकार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे.