इस्लामपूर येथे ‘गोमटेश आधार’ या उपक्रमाला जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी राजकुमार ओसवाल, संजय ओसवाल यांनी व्हीलचेअर भेट दिली. यावेळी उदय देसाई, शीतल राजमाने, सुभाष राजमाने, राजेंद्र ढबू, दुष्यंत राजमाने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील गोमटेश नागरी पतसंस्थेच्या वतीने समाजातील गरजू, अपंग व दिव्यांग नागरिकांसाठी उपयोगी साहित्याचे वाटप करण्याचा ‘गोमटेश आधार’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाला मदत म्हणून जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरचे युनिट डायरेक्टर राजकुमार ओसवाल आणि संजय ओसवाल यांनी अद्ययावत व्हीलचेअर भेट दिली. गोमटेश आधारच्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ८५ व्यक्तींना साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.
हा उपक्रम जायंट्स गु्रप ऑफ इस्लामपूर यांच्या पुढाकाराने झाला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष उदय देसाई, उपाध्यक्ष शीतल राजमाने, संचालक सुभाष राजमाने, सुरेश कबुरे, महावीर साधू, राजेंद्र ढबू, किरण शेटे, महावीर बापूळे, सुजाता करांडे, पद्मश्री दांड, अभंग भोजने, सुरेश खवळे, राजेंद्र पाटील, सचिव सुनील पाटील, व्यवस्थापक महेंद्र पाटील उपस्थित होते.
जायंट्सचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने, कार्यवाह रणजित जाधव, खजिनदार अॅड. श्रीकांत पाटील, नितीन शहा व राकेश कोठारी यांनी उपक्रमाचे संयोजन केले. कार्यकारी संचालक संजय कबुरे यांनी सूत्रसंचालन केले.