शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आटपाडीची नगरपालिका कधी? पुन्हा ग्रामपंचायतीचीच निवडणूक : सर्वच पक्षांच्या नेत्यांचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:38 AM

आटपाडी : ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी!’ या म्हणीचा प्रत्यय सध्या आटपाडीकरांना चांगलाच अनुभवायला मिळत आहे.

अविनाश बाड ।आटपाडी : ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी!’ या म्हणीचा प्रत्यय सध्या आटपाडीकरांना चांगलाच अनुभवायला मिळत आहे. आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत का नगरपालिकेत होणार याकडे डोळे लावून बसलेल्या आटपाडीकरांवर पुन्हा ग्रामपंचायतीसाठीच निवडणूक लागल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. एरवी छोट्या-मोठ्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी हपापलेल्या नेत्यांनी या अपयशाला जबाबदार कोण? हे सांगण्याची गरज आहे.आटपाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपल्याने या निवडणूक लागली आहे. तब्बल दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याची राज्यभर अंमलबजावणी झाली. तिथे नव्याने निवडणुकाही झाल्या. पण आटपाडी ग्रामपंचायतीबाबतीत मात्र निव्वळ राजकारण झाले. त्यातून नगरपंचायतीऐवजी थेट नगरपालिका करण्यात यावी, अशीही मागणी पुढे आली. पण प्रत्यक्षात फक्त तारीख पे तारीख करत कारभाऱ्यांनी मात्र पाच वर्षे काढून गावाला आपआपला नमुना दाखविला.विशेष म्हणजे तीन गटाच्या या सदस्यांमध्ये निधी वाटून घेण्यात अजिबात वाद नव्हता. सदस्यांना स्वत:च्या नावावर ग्रामपंचायतीचा कुठलाही ठेका अथवा लाभ घेता येत नसताना कुठल्या पंचाचे कुठले काम, त्यात किती डल्ला मारला, यावरच ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात कायम चर्चा होत होती. डमी नावे टाकून अनेक सदस्यांनीच कामे करून खिसे भरल्याचा आरोप वारंवार होत होता.या कारभाराला कंटाळून लोक नगरपंचायत होईल आणि कारभारात, विकासात काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा करून दिवस ढकलत होते. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने नागरिकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या निवडणुकीबद्दल अनुत्साह दिसून येत आहे. पण होणार- होणार म्हणून गाजत असलेली नगरपंचायत नेमकी होणार कधी? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.आटपाडीच्या विकासाचा मारेकरी कोण?आटपाडी म्हणजे मागास असे चित्र पूर्णपणे बदलण्यात दुर्दैवाने कुठल्याच नेत्याला आजपर्यंत यश आलेले नाही. आटपाडीच्या विकासाच्या प्रत्येक गोष्टीचं राजकारण होतं आणि आटपाडीकरांना त्यापासून वंचित ठेवलं जातं, हा आरोप अनेकदा केला जातो. नगरपंचायत झाली, तर गावाचा विकास होईल आणि हा राज्यासाठी झालेल्या निर्णयसुद्धा इथे अपवाद ठरला की ठरविला गेला? याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे.उमेदवारांच्या पोटात भीतीचा गोळा!आता संपूर्ण गावातून सरपंच निवड होतेय. त्यामुळे तेवढा खर्च करून आणि सदस्य म्हणून जरी निवडणूक जिंकली तर, नगरपंचायत कधी जाहीर होईल, याचा नेम नाही. त्यामुळे पुन्हा निवडणूक लढावी लागण्याची शक्यता उमेदवारांना हैराण करते आहे. पहिला नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्यासाठी उतावीळ होऊन गुडघ्याला बाश्ािंग बांधून तयार असणाºया उमेदवारांची तर या निवडणुकीने घोर निराशा केली आहे. नेत्यांनासुद्धा उमेदवारांना पकडून अर्ज भरा म्हणण्याची वेळ आली आहे.