तज्ज्ञ म्हणतात, अजून बरेच करावे लागेलसांगली : देशातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या राष्टÑीय महामार्गापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असलेला व रेल्वेचे सक्षम जाळे असलेल्या सांगली मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा मात्र विकास होताना दिसत नाही. जिल्ह्यातील पाणी योजनांची आवर्तने सुरू झाली; मात्र अर्धवट कामांमुळे अडचणी अद्याप कायम आहेत.देशातील प्रमुख राष्टÑीय महामार्ग अर्थात पुणे-बंगळूरू मार्ग जिल्ह्यातून जात असला तरी, त्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी वापर करून घेण्यात अद्याप यश आले नाही. सांगलीपासून केवळ पन्नासभर किलोमीटरवर हा महत्त्वाचा मार्ग असतानाही मतदारसंघात एखादा देशपातळीवरील महत्त्वाचा उद्योग अथवा औद्योगिक संस्था आलेली नाही. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या जिल्ह्यातील तरूणांना नोकरीसाठी पुण्या-मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे. सध्या विजापूर-गुहागर व रत्नागिरी-नागपूर या राष्टÑीय महामार्गाचे गतीने काम चालू आहे. देशातील प्रमुख शहरापर्यंत सहजपणे जाणारी रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. त्याचाही फायदा करून घेण्यात राज्यकर्त्यांना अपयश येत आहे. ड्रायपोर्टच्या माध्यमातून पहिले पाऊल उचलले गेले असले तरी, त्याची प्रत्यक्षातील अंमलबजावणी व त्याचा मतदारसंघाच्या विकासाला मिळणारा हातभार बघावा लागणार आहे.मिरज रेल्वे जंक्शनच्या माध्यमातून जिल्ह्याला ‘विकासाचे जंक्शन’ बनविता येऊ शकते. यासाठी राज्यकर्त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. या सुविधांचा उपयोग केल्यास जिल्ह्यातील शेतीला औद्योगिक क्षेत्राला उभारी मिळण्यास वेळ लागणार नाही.आतापर्यंत काय झाले उपाय?1जिल्ह्यातून आतापर्यंत केवळ एकच राष्टÑीय महामार्ग जात होता, आता मात्र विजापूर-गुहागर व नागपूर-रत्नागिरी या महत्त्वाच्या राष्टÑीय महामार्गांचे काम सुरू आहे.2संपूर्ण देशाला सोयीचे ‘अॅक्सेस’ असलेली रेल्वे दळणवळणाची सुविधा जिल्ह्यात उपयोग असतानाही त्याचा उपयोग होत नव्हता. आता मात्र ड्रायपोर्टच्या माध्यमातून त्याचा वापर प्रथमच होणार आहे.3जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी तीन महत्त्वाच्या पाणी योजना असल्या तरी, त्याची कामे रखडली होती. सध्या या योजना पूर्णत्वास येत आहेत.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यात वेअर हाऊसचे जाळे खूपच कमकुवत आहे. पायाभूत सुविधांचा विचार करता, वेअर हाऊसेसची संख्या वाढणे गरजेचे आहे.2जिल्ह्यात रेल्वेचे जाळे असताना व त्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी पडून असताना त्या जागांचा माल ठेवण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यासाठी रेल्वेने काही मोबदला घ्यावा, पण यामुळे रस्त्यावरील ताण कमी होऊन त्याचा फायदाही होणार आहे.3वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रस्त्यांचा विकास, उद्योग वाढीसाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत.
महामार्ग जोडणी, रेल्वेमार्गाच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:53 PM