सांगली : जिल्ह्याच्या एका टोकाला सर्वदूर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा, मध्यभागी समृद्ध कृष्णा-वारणा नदीकाठ, तर दुसऱ्या टोकाला धार्मिक स्थळे, स्मारके, ऐतिहासिक वारसा असणारी स्थळे, अशा विविधतेने नटलेल्या या जिल्ह्यात पर्यटन वाढीला मोठा वाव आहे; पण राजकीय उदासीनतेमुळे पर्यटन विकासाची चाके फिरू शकलेली नाहीत.चांदोली, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, प्रचितगड, वाळवा तालुक्यातील रामलिंग बेट, सांगलीतील गणेश मंदिर, कृष्णा घाट, मिरजेतील मीरासाहेब दर्गा, दंडोबा अभयारण्य, हरिपूरचा कृष्णा-वारणा संगम, औदुंबरचे दत्त मंदिर, अशी पर्यटन स्थळांची यादी बरीच लांबलचक आहे. वसंतदादा ते गदिमांपर्यंत अनेकांची स्मारकस्थळेही जिल्ह्यात उभारली गेली आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने अनेक स्थळांचा विकासही करण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण, झोळंबीचे पठार, कृष्णा-वारणा नद्यांचा संगम, औदुंबरचे दत्त मंदिर आणि डोह, नाट्यपंढरी सांगली, मिरजेचे तंतुवाद्य, कृषी पर्यटन अशा मुद्द्यांना प्रकाशात आणण्याची गरज आहे.
सांगली जिल्ह्यात पर्यटन स्थळांचा विकास होणार तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:11 PM