शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

सांगली जिल्ह्यातील नेत्यांनो, चारा-पाण्यावर कधी बोलणार?; सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार प्रचारात दंग

By अशोक डोंबाळे | Published: April 12, 2024 6:24 PM

संतप्त शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना सवाल

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिल महिन्यातच ७७ गावे, ५६६ वाड्यांना ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही उमेदवार आणि नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार? असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.जिल्ह्यात ७३४ गावे असून, लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ८३ छोट्या-मोठ्या प्रकल्पांपैकी २२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. सद्य:स्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ७७ गावे आणि ५६६ वाड्यांवर एप्रिलमध्येच ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार?, याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वांनाच लागली आहे.पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमोल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो-तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे.

चाराटंचाईने पुशधनाची उपासमारीमान्सून आणि परतीचा मान्सून पाऊस न झाल्यामुळे खरीप आणि रब्बी पेरणीच दुष्काळी तालुक्यात झाली नाही. परिणामी, पशुधनासाठी चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे पशुपालक कडब्याच्या एका पेंढीला १५ ते १९ रुपये मोजत आहे. दिवसाला एका पशुधनास किमान पाच ते सहा पेंढ्यांची गरज आहे. दिवसाचा खर्च पशुधनाचा १०० रुपयांवर चालल्यामुळे शेतकरी कवडीमोल किमतीला पशुधन विक्री करू लागले आहेत. ओला चारा नसल्यामुळे दुभत्या पशुधनाचे हाल होत आहेत.

खासगी विहिरी, बोअर अधिग्रहणतालुका - संख्याजत - ३४क.महांकाळ - १खानापूर - ४आटपाडी - २

दोन लाखांवर लोकसंख्येला टंचाईची झळजिल्ह्यातील ८३ गावे आणि ५६६ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाखांवर लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईची झळ पोहोचली आहे. ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय जत तालुक्यातील शिंगणापूर, वज्रवाड, कोणबगी, कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी, खानापूर तालुक्यातील कुर्ली-घाडगेवाडी, रेवणगाव, घोटी खुर्द या गावांतही पाणीटंचाई निर्माण झाली असून, भविष्यात टँकर लावावे लागणार आहेत.

प्रशासन म्हणतेय, ३० दिवस पुरेल चारा..

  • जत तालुक्यातील लहान, मोठे, शेळी, मेंढ्यांना ३० दिवस पुरेल एवढा चारा आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन तीन किलो, तर मोठ्यांसाठी सहा किलो चारा लागतो.
  • प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही दोन महिने पुरेल एवढा चारा आहे.
  • असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागांत चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.
  • डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ