गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा जोर धरला आहे. दररोज ४०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. सांगली व मिरज शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात जिल्ह्याच्या तुलनेत दररोज ३० ते ३५ रुग्ण वाढत आहेत. महापालिकेने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनाही हाती घेतल्या आहेत. कोरोना रुग्णांसाठी वाॅररूमही तयार केले आहे. शिवाय मिरजेत कोविड रुग्णालय सुरू केले आहे.
सध्या शहरात गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या अधिक आहे. या कोरोना रुग्णांचा कचरा स्वतंत्ररीत्या उचलण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी केली आहे. प्रभाग समितीनिहाय चार घंटागाडी व त्यावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांची यादी स्वच्छता निरीक्षकांकडे देण्यात आली आहे. त्यानुसार ही घंटागाडी रुग्णांच्या घरापर्यंत जात आहे. रुग्णांचा कचरा स्वतंत्ररीत्या उचलून तो खासगी ठेकेदाराच्या कचरा भस्मीकरण केंद्राकडे पाठविला जात आहे.
चौकट
कचऱ्यातून कोरोना पसरू शकतो का?
१. कचऱ्यातून कोरोनाचा पसार होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
२. गृह विलगीकरणातील रुग्णांचा कचरा घरात स्वतंत्ररीत्या साठविला जात आहे. तशा सूचना महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून दिल्या गेल्या आहेत.
३. हा कचरा थेट भस्मीकरण केंद्राकडे पाठविला जातो. तिथे हा कचरा जाळला जात असल्याने त्यातून संसर्गाची शक्यता धूसर बनते.
४. कोविड रुग्णालये, केअर सेंटरमधीलही कचरा उचलताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
चौकट
कोट
गेल्या काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गृह विलगीकरणातही रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्यावर मनपाकडून लक्ष ठेवले जात आहे. त्यांचा कचरा वेगळा जमा करण्याची यंत्रणाही उभारली आहे. त्यासाठी स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी दिली आहे. - डाॅ. रवींद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
चौकट
१. कचरा एकत्र करणारे कर्मचारी : १२००
२. ४० टन ओला कचरा
३. १३० टन सुका कचरा
चौकट
शहरातील एकूण रुग्ण : १८८८८
बरे झालेले रुग्ण : १७०००
उपचार घेत असलेले रुग्ण : १८८८
गृह विलगीकरणातील रुग्ण : ५००