शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राजू शेट्टी-जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? : भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 9:52 PM

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही.

ठळक मुद्दे निवडणुकीचे रंग ; दोन्ही पक्षांकडून ताकदीचे प्रदर्शन महाराष्ट्रात दौरा करताना आपले लक्ष आपल्या इस्लामपूर मतदारसंघावरही केंद्रित केले

अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही. सध्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची नावे भाजपच्या श्रेष्ठींपुढे आहेत; तर व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलाचे नेते राहुल महाडिक यांनी स्वबळावर शड्डू ठोकला आहे.

भाजपकडून वैभव नायकवडी यांनाही आमंत्रित करण्याचा डाव आखला जात आहे. एकूणच भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार दिसत आहे.भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळणार, हे गृहीत धरूनच शिराळा मतदारसंघात भाजपची वाटचाल सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ‘आमदार नाईक पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर’ या चर्चेला उधाण आले होते. यावर स्वत: शिवाजीराव नाईक यांनी पडदा टाकला आहे. आता तर त्यांनी हातकणंगलेतून भाजपचाच खासदार होणार, असे भाकीत करून भाजपवरील आपली निष्ठा दाखवून दिली आहे. परंतु खासदार शेट्टी यांच्याविरोधात कोण? यावर आमदार नाईक यांनी मौन पाळले आहे.

इस्लामपूर येथे महागाईविरोधात राष्ट्रवादीने काढलेला मोर्चा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. इस्लामपूर नगरपालिकेत परिवर्तन झाले असले तरी, जयंत पाटील यांची ताकद आजही मतदारसंघात अभेद्य असल्याचे दिसते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील यांची नावे असली तरी, महाडिक आणि हुतात्मा गटाची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार म्हणून एकमताने एकही नाव अद्याप पुढे आलेले नाही.

एकंदरीत जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात दौरा करताना आपले लक्ष आपल्या इस्लामपूर मतदारसंघावरही केंद्रित केले आहे. देशातील महागाईच्या विरोधातील पहिला मोर्चा इस्लामपूर येथे काढून राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली आहे. या मोर्चात सहभागी १० ते १२ हजार जनसमुदाय पाहून विरोधी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे.यापूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथे कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आपली ताकद तपासली आहे. आता राष्ट्रवादीच्या या मोर्चाला भाजप काय प्रत्युत्तर देणार, याकडेच इस्लामपूरकरांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Jayant Patilजयंत पाटील