सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ योजनेचा शुक्रवारी (दि.29) सायंकाळी टप्पा क्रमांक पाच ओव्हर फ्लो झाला. शनिवारी (दि.23) दुपारी टप्पा क्रमांक चार ओव्हर फ्लो झाल्याने कोबी, ऊस, भेंडी, कोंथिबीर पिकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वारंवार होणाऱ्या ओव्हर फ्लो'ला जबाबदार तरी कोण? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जाऊ लागला आहे.म्हैसाळ योजना ही दुष्काळ भागात संजीवनी देणारी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळ भागाला पाणी सोडले जाते. या वर्षी पाणी टंचाई असल्याने ऐन पावसाळ्यात म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली. एकीकडे नदीपात्रात पाण्याची टंचाई असताना अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजना अभावी ओव्हर फ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या ओव्हर फ्लोमुळे आरग येथील शेतकरी गोपाळ कोरे यांची अर्धा एकर कोबी पाणी साचल्याने उध्वस्त झाला. दत्ता कोरे यांच्या एक एकर ऊसात पाणी साचल्याने उस कुजला आहे. ओंमकार शिंदे यांची अर्धा एकर भेंडी व मच्छिंद्र पाटील यांची एक एकर कोंथिबीर वाहून गेली. वारंवार होणाऱ्या या ओव्हर फ्लो मुळे जवळपास दोनशे एकर शेतीला याचा त्रास होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
म्हैसाळ योजना आठवड्यातून एखादा तरी ओव्हर फ्लो होते. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. उस पिकत नाही. गेली वीस वर्षे मी या त्रासाला सामोरे जात आहे. यावर योग्य त्या उपाय योजना कराव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू - श्रीधर कोरे, शेतकरी, आरगपंप हाऊसमधील विद्युत प्रवाह तीन ते चार वेळा ट्रीप झाले. त्यामुळे पंप बंद होऊन ओव्हर फ्लो झाला. या बाबात वरीष्ठांना कळविले आहे. लवकरच उपाययोजना करू - रवि माळी, उप अभियंता -टप्पा क्रमांक चार
यांत्रिक विभाग करतो काय?पंप नियंत्रित करण्याचे काम यांत्रिक विभागाकडे येते. वारंवार ओव्हर फ्लो होते. मग यांत्रिक विभाग नेमके काय करतो?अधिकारी काय करतात? यावर कोणाचे अंकुश आहे की नाही असे प्रश्न समोर येत आहेत.