Sanjaykaka Patil ( Marathi News ) : राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे, याआदी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. कोल्हापूरात शरद पवारांनीभाजपाला मोठा धक्का देत समरजीत घाटगेंना पक्षात प्रवेश दिला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आणखी काही नेते निवडणुकीपूर्वी प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता सांगलीतील भाजपा नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांनी खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली, या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या. आता या भेटीत नेमक्या काय चर्चा झाल्या यावर स्वत: संजयकाका पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
“२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी
"मी काल आधी दिल्लीत गडकरी साहेबांना भेटलो. त्यांनी ४ ऑक्टोंबर ही तारीख दिली. मी आज सकाळी शरद पवार साहेबांना फोन केला. सांगलीत मराठा समाज सांस्कृतिक भवन या नावाखाली गेली ७५ वर्षे काम करतंय. सर्व समाजाच्या हितीसाठी ते प्रमाणिकपणे काम करतात, तिथे पूर्वी एक लहान पुतळा होता. आता त्या पुतळ्याचे मोठे स्वरुप करुन त्यांनी आता इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ फुटी पुतळा तिथे बसवला आहे, त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मी मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार साहेबांची वेळ घेतली, अशी माहिती माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
आठ ते दहा मिनिटांची भेट झाली
"शरद पवार साहेब यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. मी आज सकाळीच शरद पवार साहेबांना फोन केला होता तेव्हा साहेब बारामती येथे होते. मला त्यांनी पाच ते सहा वाजण्याच्या वेळेत पुण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी तिथे भेटूया असंही सांगितले, ही भेट आमची आठ ते दहा मिनिटांची झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, याच कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आहे. त्या मंडळाचे काही मंडळीही उपस्थित होते, असंही माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले.
"आम्ही या कार्यक्रमाला सर्वांना बोलवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी भेटणार आहे. मी राजकीय भेट घेतलेली नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्ये समाधानी आहे, मी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अनेकांचे फोन आले होते, मी त्यांना सांगितले राजकीय भेट नव्हती. मी या कार्यक्रमासाठी भेटलो असल्याचे त्यांना सांगितले आहे, असंही पाटील म्हणाले.