शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

मुख्यमंत्र्यांना सांगलीबद्दल द्वेष का? : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 9:13 PM

महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला.

ठळक मुद्देबळ नसल्यानेच भाजपकडून पोलीस बळाचा वापर

सांगली : महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडेतीन वर्षात कधीही सांगलीला आले नाहीत. सांगलीकरांबद्दल त्यांच्या मनात द्वेष का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पाटील म्हणाले की, निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा घातला पाहिजे. पण प्रशासन एककल्ली कारवाया करीत आहेत. मिरजेत रात्रीच्या सुमारास काँग्रेस उमेदवारांच्या घरात घुसून चित्रिकरण केले गेले. पदयात्रेत सहभागी कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या धमक्या दिल्या जात आहेत. ख्रिश्चन समाजातील एका व्यक्तीला तर पोलीस ठाण्यात तीन दिवस बसवून घेऊन जाब विचारला गेला. महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून येणार नाहीत, हे पाहून आता पोलीस बळाचा वापर केला जात आहे. यात अधिकाऱ्यांचा दोष नाही. तरीही मुख्यमंत्री, मंत्री, सत्ताधाºयांना खूश करण्यासाठी काही वेगळे प्रकार सुरू आहेत. आम्ही दाखवतो, त्या घरांची झडती त्यांनी घ्यावी, प्रशासनाने त्याचा अतिरेक करू नये.

भाजपने जनतेचा विश्वास गमावला आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या प्रश्नांवर ते अपयशी ठरले आहेत. महागाई, पेट्रोल दरवाढीने जनता हैराण झाली आहे. त्यामुळेच भाजपला जनतेचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस सांगलीला आले नसावेत. गेल्या साडेतीन वर्षात ते कधीही सांगलीला आले नाहीत. ते सांगलीकरांचा इतका द्वेष का करतात, असा टोला लगावत पाटील म्हणाले की, या शहरात नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी दोन्ही काँग्रेसने आघाडीचा निर्णय घेतला आहे. आमचा जाहीरनामा सामान्य लोक केंद्रबिंदू मानून तयार केला आहे. त्याची निश्चित पूर्ती केली जाईल.मुख्यमंत्र्यांचीच दिशाभूलमुख्यमंत्र्यांचा एक संदेश व्हायरल झाला आहे. त्यात ते स्क्रीनवर वाचून संदेश देत असल्याचे दिसते. त्यांनी सांगितलेली आकडेवारीही चुकीची आहे. ट्रक टर्मिनलला ते ट्रॅक टर्मिनल म्हणाले. ते हुशार आहेत. पण त्यांची कुणीतरी दिशाभूल केली असावी. आम्ही सुरू केलेल्या अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी संदेशात केला आहे. या योजनांचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.बातमीला जोड....ईव्हीएमची आधी तपासणी व्हावीईव्हीएमबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी ईव्हीएमची तपासणी सर्वपक्षीय उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर व्हावी. थेट केंद्रावर ईव्हीएमची तपासणी करून मतदान प्रक्रिया सुरू करू नये, असे पत्र प्रशासनाला दिले आहे. मतांची बेरीज करतानाही ५० नव्हे, तर ५०० मते ईव्हीएमवर टाकली जावीत, असेही पाटील म्हणाले. जनतेचा प्रतिसाद नसल्याने भाजपचा ईव्हीएम हा शेवटचा पर्याय असू शकतो, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगलीElectionनिवडणूकPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस