शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Sangli: गर्भपातावेळी विवाहितेचा मृत्यू: बोगस महिला डॉक्टरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 16:48 IST

महालिंगपूर पोलिसांची कारवाई ; आणखी काही डॉक्टरांचा सहभाग

सांगली : महालिंगपूर (जि. बागलकोट) येथे गर्भपातावेळी सोनाली सचिन कदम (वय ३२, रा. आळते, ता. हातकणंगले) हिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात कविता बडनेवार या बोगस डॉक्टर महिलेस अटक केली आहे. तर मृत सोनालीचा भाऊ देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. महालिंगपूर पोलिसांनी केलेल्या तपासात रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही आणखी एका डॉक्टरचे नाव निष्पन्न झाले आहे. लवकरच त्यालाही ताब्यात घेतले जाणार आहे.दुधगाव येथे माहेर असलेल्या सोनाली कदम हिचा आळते येथील सचिन कदम याच्याशी विवाह झाला आहे. त्यांना दोन मुली आहेत. सचिन हा सैन्यदलात कार्यरत असून सध्या राजस्थानात कार्यरत आहे. सोनाली ही तिसऱ्यांदा गर्भवती असताना जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान चाचणी करण्यात आली. त्यानंतर कर्नाटकात गर्भपात करताना महालिंगपूर येथे सोमवारी मृत्यू झाला होता. तेथील डॉक्टरांनी या प्रकरणात मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिल्याने सोनाली यांचे नातेवाइक मृतदेह घेऊन सांगलीत आले होते. मृत्यूच्या दाखल्यासाठी सांगलीत डॉक्टर शोधत फिरत असताना सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

सांगली शहर पोलिसांनी मृत सोनालीचा भाऊ आणि मदत करणाऱ्या बोगस डॉक्टरला महालिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने बागलकोट येथे जावून तेथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा वर्ग केला आहे. महालिंगपूर पोलिसांनी प्राथमिक तपासात कविता बडनेवार या बोगस डॉक्टर महिलेला अटक केली आहे. तिच्याकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना तिने सोनाली यांचा गर्भपात केला होता. यावेळी प्रकृती गंभीर बनल्याने तिचा मृत्यू झाला होता. महालिंगपूर पोलिस कविता हिची चौकशी करत आहेत. या प्रकरणात रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही एका डॉक्टरचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.रॅकेट कार्यरतगर्भलिंग निदान चाचणीनंतर बेकायदा गर्भपात करणारे रॅकेटच कर्नाटकातील महालिंगपूर भागात कार्यरत असल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यामुळे पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीAbortionगर्भपातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस