देशातील शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणारे पंतप्रधान किसान योजनेचे क्षेत्रीय पातळीवरचे काम ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांच्याकडे समान प्रमाणात होते; परंतु सर्वांत जास्त काम ग्रामसेवकांनी केले. असे असताना देशपातळीवरील पुरस्कार स्वीकारताना ग्रामविकास मंत्री व सचिव यांना न बोलावून त्यांचा उल्लेखही न केल्याबद्दल सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी निषेध केला.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या बहुतांशी योजनांमध्ये ग्रामसेवकांची नियुक्ती केली जाते. ग्रामविकास विभागाच्या घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशन व इतर राष्ट्रीय कार्यक्रमात कधीच तलाठी व कृषी सहायकांची नियुक्ती केली जात नाही. ग्रामविकास विभागाच्या परवानगीशिवाय महसूल व इतर विभागाने ग्रामसेवक संवर्गास कामे सांगू नयेत.
तसेच ग्रामसेवक संवर्गास जॉब चार्टव्यतिरिक्त लादलेली कामे कमी करावी याबाबत ग्रामविकास विभागाने एक समिती स्थापन केली असून या समितीने
काहीच कामकाज केले नसून याबाबत ग्रामविकास मंत्री
हसन मुश्रीफ यांना भेटून चर्चा करण्यात येणार आहे, असे विजय म्हसकर यांनी सांगितले.