शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का? दोन वर्षापासून अधिकारीच फिरकले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:54 PM

चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून भिंतीवरील पथदिवे बंद : सीसीटीव्ही कॅमेरे बंद

गंगाराम पाटील ।वारणावती : चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे कोणत्याहीक्षणी धरणाला धोका पोहोचू शकतो. धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाची निर्मिती १९७६ मध्ये झाली. प्रथम १९८४ मध्ये अंशत: पाणीसाठा करण्यात आला, तर १९९२ पासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली. याच धरणाच्या पायथ्याशी १६ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प आहे. सिंचनासह वीजनिर्मिती होते. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३६७.१७ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात पाण्याची आवक होत असल्याने हा परिसर पावसाचे आगर समजला जातो.

कोकणचे प्रवेशद्वार असणाºया या परिसरात पावसाळ्यात धुवाधार पाऊस, वारा व वारंवार होणाºया भूकंपामुळे हा परिसर संवेदनशील क्षेत्र आहे. पण धरण व पाणी याचे प्रशासन जलसंपदा विभागाकडे, तर वसाहत देखभाल व दुरुस्ती, वीज, पाणी हे कृष्णा खोरे विकास महामंडळ प्रशासनाकडे आहे. धरणाची सुरक्षा पोलीस यंत्रणेकडे व वीजनिर्मिती विद्युत पारेषण कंपनीकडे आहे. धरणाची अशी चार विभागांकडे विभागणी झाली आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रशासनाचा जबाबदार अधिकारी नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी टाळताना दिसत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

वारंवार तक्रारी करूनही धरण प्रशासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून हे धरण पूर्णपणे अंधारात आहे. त्यामुळे धरणाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी, सोनवडे, चरण, कोकरुड परिसरातील शेतकºयांनी केली आहे.धरणाला कोणताही धोका नाहीधरणाच्या धोक्याविषयी शाखाधिकारी प्रदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चांदोली धरण हे राज्यातील मातीचे दुसºया क्रमांकाचे धरण आहे. नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांकडून देखभाल, दुरुस्ती केली जाते. वर्षातून दोनवेळा त्याची पाहणी केली जाते. त्याचा अहवाल दिला जातो. धरण मजबूत असून धरणाला कोणताही धोका नाही.

टॅग्स :DamधरणSangliसांगली