आटपाडी : शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी येईपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. येत्या २६ जून रोजी आटपाडीत २७ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. संघटित राहून आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.आटपाडीतील तांबडा मारुती देवालयाच्या सभागृहात शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी बोलताना नायकवडी म्हणाले, पाण्याचे समान वाटप करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णांनी १३ दुष्काळी तालुक्यात पाणी येण्याचे स्वप्न पाहिले होते, हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा तीव्र करण्यात येईल. शेतात पाणी बघणार आणि मगच चळवळ थांबणार आहे. पाणी परिषद यशस्वी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, पावसाळ्यात पुराचे पाणी कृष्णा नदीतून वाहून जाते. त्यावेळीच नियोजन करून दुष्काळी भागाला हे वाहून जाणारे पाणी दिले पाहिजे. पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे.माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, टेंभू योजनेची पाण्याची आवर्तने ठरली पाहिजेत. आटपाडी तालुक्यातील वगळलेल्या गावांचा समावेश टेंभू योजनेत केला गेला पाहिजे. राजेवाडी तलावात पाणी आले पाहिजे.बैठकीत प्रारंभी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. बाबूराव गुरव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, अॅड. बाळासाहेब बागवान, प्रा. विश्वंभर बाबर, चंद्रकांत देशमुख, आर. एस. चोपडे, शिवाजीराव पाटील, बाळासाहेब नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार : वैभव नायकवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 5:20 PM
शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी येईपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. येत्या २६ जून रोजी आटपाडीत २७ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. संघटित राहून आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.
ठळक मुद्देपाण्यासाठी संघर्ष करावा लागणार : वैभव नायकवडी आटपाडीत शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेची बैठक