..आता राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणार?, आमदार गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
By श्रीनिवास नागे | Published: April 3, 2023 04:00 PM2023-04-03T16:00:32+5:302023-04-03T16:28:13+5:30
नवीन राष्ट्राच्या निर्मितीमध्ये सावरकर यांचे मोठे योगदान
आटपाडी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत मणीशंकर अय्यर यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधान केले, तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः हातामध्ये जोडा घेऊन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. उद्धव ठाकरे आता राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोड्याने मारणार आहेत का, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान आमदार पडळकर यांनी येथे दिले. वीर सावरकर गौरव यात्रेत ते बोलत होते.
पडळकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार प्रखर राष्ट्रवादाचा होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या चुकीच्या रूढी, परंपरा होत्या, त्यांना बाजूला सारून नवीन राष्ट्राच्या निर्मितीमधील सावरकर यांचे मोठे योगदान आहे.
परंतु वर्षभरामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिपणी करीत आहेत. मुळात काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सावरकर समजणारच नाहीत. ते ज्या पद्धतीने सावरकर यांचा अपमान करत आहेत, ते महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.
यावेळी हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील, जयवंतराव सरगर, ब्रह्मानंद पडळकर, विलासराव काळेबाग, मोहन रणदिवे, जनार्दन झिंबल, विष्णुपंत अर्जुन, नारायणराव चवरे, दादासाहेब मरगळे, रूपेशकुमार पाटील, आबासाहेब पुजारी, अनिल सूर्यवंशी, यल्लाप्पा पवार, राजेंद्र खरात उपस्थित होते.