शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

शिराळा तालुक्यात वादळी पाऊस : अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, वीजपुरवठा खंडीत झाल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:18 PM

शिराळा : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागास सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले.

शिराळा : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागास सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. तसेच तालुक्याच्या उर्वरित भागात ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊस पडला. शिराळा येथील आठवडा बाजार तसेच गोरक्षनाथ यात्रा असल्याने भाजी व इतर विक्रेत्यांची तारांबळ उडाली.शिराळा, मांगले, पुनवत, सागाव, शिरशी, बांबवडे, वाकुर्डे, तालुक्याच्या उत्तर भागात ढगाळ वातावरण होते. शिराळा येथे गोरक्षनाथ यात्रा चालू आहे. वादळी वाºयाच्या हजेरीने येथील स्टॉलधारकांची मोठी तारांबळ उडाली. तसेच आठवडा बाजार असल्याने भाजी आदी विक्रेते विक्री होईल त्या भावाने भाजीपाला विक्री करत होते.चरण : चरणसह मोहरे, नाठवडे, पणुंब्रे, वारुण, कदमवाडी, किनरेवाडी, काळुंद्रे, मराठवाडी, करुंगली, आरळा आदी परिसरात सोमवारी ४.३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली.वादळी पावसात रस्त्यावर झाडे कोसळली. त्यामुळे काहीकाळ विस्कळीत झाली. आनंदराव नेर्लेकर यांच्या छपरावरील पत्रे उडाले.वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे, आरळा, मणदूर, चरण परिसरास सोमवारी दुपारी चार वाजता वादळी वाºयासह जोरदार पावसाने झोडपून काढले. यंदा पहिल्यांदाच वळीव पावसाने हजेरी लावली.सोमवारी दुपारी चार वाजता ढगांचा गडगडाट व वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर जोरदार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची मोठी धावपळ उडाली. जळणासाठी लागणाºया शेणी तसेच वाळलेले गवत, पिंजर भिजून गेले. वादळी वाºयाने ठिकठिकाणचे शेडवरील पत्रे उडून गेले, तर आंबा, काजू व अन्य फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.गेल्या आठ दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. सोमवारी दिवसभर मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ झाली होती. शेतकरी वर्गाची शेतीची कामे करताना अंगाची लाही लाही होत होती. सोमवारी सायंकाळी चार वाजता जोरदार पावसाने हजेरी लावल्याने गारवा निर्माण झाला.कोकरुड : गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाºया वळिवाच्या पावसाने तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागात सोमवारी वादळी वाºयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शेतीच्या कामाला वेग येणार आहे. कोकरुड येथे वळिवाच्या पावसामुळे खबरदारी म्हणून परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पश्चिम भागातील कोकरुड, चिंचोली, शेडगेवाडी, येळापूर, मेणी, तर उत्तर भागातील पाचुंब्री, शिरशी, धामवडे, वाकुर्डे, कोंडाईवाडी आदी परिसरात वादळी वाºयाने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. पावसामुळे हवेत गारवा वाढला असून, यामुळे खरीप हंगामातील मशागतीला वेग येणार आहे.कुंडल परिसरातही जोरदार पाऊसकुंडल परिसराला सोमवारी वादळी वाºयासह पावसाने तडाखा दिला. जवळपास अर्धा तास पाऊस सुरु होता. यावेळी जोरदार वारा व मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यामुळे विजेचा पुरवठा काही काळ खंडित झाला होता. तसेच अनेक वृक्ष उन्मळून पडले. कुंडल-विटा रस्त्यावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. किर्लोस्करवाडी रोड येथेही वृक्ष उन्मळून पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.