खानापूर, कडेगाव तालुक्यात मुसळधारसांगलीत वादळी वारे : वांगी, कडेपूर रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प; वीज पुरवठा खंडितसांगली : जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, पलूस तालुक्यांना वळिवाने बुधवारी झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह वळिवाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. वांगी, भाळवणी, कळंबी, ढवळेश्वर येथे मुसळधार पाऊस झाल्यामुळे ओढे, नाले भरून वाहत होते.विटा/भाळवणी : विटा शहरासह तालुक्याच्या काही भागात बुधवारी दुपारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. मात्र, बुधवारी सायंकाळी चार वाजता आळसंद, खंबाळे-भा., भाळवणी, कमळापूर, कळंबी, ढवळेश्वर आदी ठिकाणी सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाले, ताली भरून वाहू लागल्याचे दिसून आले. या पावसाचा शेतकऱ्यांना मशागतीसाठी फायदा होणार आहे. तालुक्यातील भाळवणी, कळंबी, कमळापूर या परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने ओढे, नाले वाहत आहेत. विटा शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आळसंद येथे तासभर झालेल्या पावसाने पिक अप् शेडमध्ये पाणी साचले. तसेच शेतातून पाणी वाहू लागले. या पावसाने पिक अप् शेडमध्ये थांबलेल्या प्रवाशांचे हाल झाले. बामणी, पारे, मंगरूळ, चिंचणी आदी गावांसह खानापूर येथेही पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या.पलूस : विजांच्या कडकडाटासह पलूस व परिसरात बुधवारी तासभर पावसाने हजेरी लावली. पलूससह तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना पाणी मिळाले आहे. (वार्ताहर)
सांगलीत वादळी वारे --वीज पुरवठा खंडितवाहतूक ठप्प;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2016 1:01 AM