शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

विट्यात आर्चीचे चाहते ‘सैराट’, चोरटे ‘झिंगाट’

By admin | Published: August 12, 2016 12:05 AM

गर्दीत तीन लाखांची रोकड लंपास : दुचाकीसह डझनभर मोबाईल गायब

विटा : येथे अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात ‘आर्ची’चे चाहते ‘सैराट’ झाले असताना गर्दीचा गैरफायदा घेऊन ‘झिंगाट’ चोरट्यांनी चांगलाच हात मारला. गर्दीत कापडी पिशवी कापून चोरट्यांनी दोन लाख ५० हजार, तर एकाचा खिसा कापून ४० हजार अशी एकूण दोन लाख ९० हजारांची रक्कम लंपास केली. यावेळी गर्दीत तरुणांचे १२ मोबाईल व एक दुचाकीही लांबविली गेली. गुरुवारी सव्वाबाराच्या सुमारास विटा पोलिस ठाण्यासमोरच या चोऱ्या झाल्या.येथे अभिनेत्री रिंकू राजगुरू ऊर्फ आर्ची एका कार्यक्रमानिमित्त आली होती. कार्यक्रमस्थळ पोलिस ठाण्याजवळच आहे. रिंकू येण्यापूर्वीच हजारो चाहत्यांची गर्दी पोलिस ठाण्यासमोरच्या रस्त्यावर झाली होती. पोलिसही गर्दीला काबूत ठेवण्यासाठी बंदोबस्तात गुंतले होते. मानसिंग सहकारी बॅँकेच्या विटा शाखेतील शाखाप्रमुख राजेश नेने व शिपाई आनंदा रानमाळे सात लाख रुपयांची रक्कम कार्यक्रम स्थळाजवळ असलेल्या आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या विटा शाखेत जमा करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी गर्दीतून मार्ग काढत ते शाखेत पोहोचले. मात्र, तेथे कापडी पिशवी ब्लेडने कापून त्यातील दोन लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय या गर्दीत थांबलेल्या अजित शिवाजी कुरळे (रा. विवेकानंदनगर, विटा) यांच्या खिशातून रोख ४० हजार रुपयेही चोरट्यांनी लंपास केले. रिंकूला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन लाख ९० हजार रुपयांच्या रकमेवर हात मारल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून, सहायक पोलिस फौजदार एन. बी. सावंत पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या गर्दीत चोरट्यांनी १२ मोबाईलसह एक दुचाकीही लंपास केली. (वार्ताहर)