शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

विट्यात भरदिवसा दागिने पळविले

By admin | Published: January 31, 2016 12:34 AM

दोन घटना : दुचाकीस्वारांचे कृत्य

विटा : विटा येथे खानापूर रस्त्यावर पंचशीलनगर व लेंगरे रोडवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाऊण तासाच्या फरकाने दोन विवाहितांच्या गळ्यातील सुमारे ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. ही घटना शनिवारी सकाळी १०.४५ आणि ११.३० वाजता घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. विटा येथील लेंगरे रस्त्यावर राहणाऱ्या सौ. छाया दीपक पटेल (वय २८) या त्यांची मुलगी सृष्टी व पुतणी प्राची यांना प्राथमिक शाळेत सोडण्यासाठी सकाळी १०.४५ वाजता लेंगरे रस्त्यावरून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या आलेल्या पल्सर दुचाकीवरील दोन जणांनी दुचाकीचा वेग कमी केला. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याने सौ. छाया यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे गंठण हिसडा मारून लंपास केले. हणमंतनगर येथील सौ. उषा विकास सपकाळ (वय २६) पंचशीलनगर येथे मैत्रीण अर्चना पवार यांच्या घरी हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी जात होत्या. त्याच्यासोबत शेजारी राहणाऱ्या सौ. मीना हसबे होत्या. या दोघी खानापूर रस्त्याने जात असताना पंचशीलनगरनजीक काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी सौ. उषा यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व २० हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण असे एकूण एक लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे व उपनिरीक्षक अमोल शिंदे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)