शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 12:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केले.कुंडल येथे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या सहभागाने, क्रांतिसिंह ...

लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केले.कुंडल येथे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या सहभागाने, क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीच्या औचित्याने खुले चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी ‘शेतकºयांची कर्जमाफी : मिळालं काय आणि मिळवायचं काय?’ या विषयावर कॉ. डॉ. ढवळे बोलत होते.क्रांती उद्योग समूहाचे नेते अरुण लाड अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत व्ही. वाय. पाटील, जि. प. सदस्य शरद लाड, कॉ. उमेश देशमुख, जे. पी. लाड, कुंडलिक एडके, वसंतराव लाड, प्रा. बाबूराव लगारे, प्रा. सुनील काकडे, अ‍ॅड. सुधीर गावडे आदी प्रमुख उपस्थित होते.कॉ. ढवळे म्हणाले की, सरकार आणि त्यांची ऐतिहासिक कर्जमाफी फसवी आहे. याविरुद्ध शेतकºयांनी संघटितपणे संघर्ष करण्याची गरज आहे. या तीन वर्षांत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात मोठे संकट आकार घेत असल्याचा अंदाज नॅशनल क्राईम बिरो आॅफ रेकॉर्डने व्यक्त केला होता. जागतिकीकरणाच्या धोरणानंतर १९९२ पासून गेल्या पंचवीस वर्षांत देशातील साडेतीन लाख शेतकºयांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. आयात-निर्यात धोरणाने बरबाद केले. महाराष्ट्रातील सत्तर हजार शेतकºयांनी कर्जाला कंटाळून जीवन संपवले. संपाच्या रूपाने प्रचंड चिडलेल्या, संतापलेल्या शेतकºयाला व्यक्त व्हायला वाट मिळाली.अरुण लाड म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे तीन हजार कोटीचे नुकसान झाले. दोन कोटी नोकºयांचे आश्वासन फसवे ठरले. आज जिल्ह्यातील ३५०० शेतकरी तरुणांचा विवाह होत नाही.यावेळी प्राचार्य तानाजीराव चव्हाण, प्रा. रवींद्र येवले, म. मा. फाटक गुरुजी, बी. बी. खोत, मारुती शिरतोडे, कॉ. दीपक घाडगे, मारुती शिरतोडे आदी उपस्थित होते.यावेळी चळवळीतील विशेष कार्याबद्दल कवी संदीप नाझरे, विशाल शिरतोडे, वैभव माळी, जमीर सनदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कॉ. अर्जुन जाधव यांनी स्वागत केले. आदम पठाण यांनी सूत्रसंचालन केले.