याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी नरेश कृष्णा पुजारी वय ५२ रा. इचलकरंजी जि. कोल्हापूर यास अटक केली. अश्विनी सत्तार या राणी चन्नम्मा एक्स्प्रेसने पतीसोबत बेंगलोरला जात होत्या. रेल्वे मिरज स्थानकात थांबली असताना सत्तार या सोन्याचे दागिने असलेली पर्स सीटवर ठेवून सेल्फी काढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरल्या. पर्स जवळ कोणी नसल्याचे पाहून पुजारी याने पर्स चोरून मिरज -कोल्हापूर रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाखाली जाऊन लपला होता. गाडीत सीटवर ठेवलेली पर्स चोरीस गेल्याचे सत्तार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कांबळे, धनंजय सुतार, सूर्यकांत कांबळे व परशराम हांगे यांच्या पथकाने स्थानक व परिसरात संशयिताचा शोध घेऊन पुजारी यास पकडले. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने ताब्यात घेऊन सत्तार यांना परत दिले. याबाबत मिरज रेल्वे पोलीस तक्रार ठाण्यात आहे.
मिरज रेल्वेस्थानकातून महिलेची पर्स चोरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:21 AM