शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महिलांनी पालकमंत्र्यांच्या पायावर ठेवले मूल

By admin | Published: February 06, 2016 12:06 AM

जत येथील नागरिक : पुनर्वसनाच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांना घेराव

सांगली : जत येथील उद्यानाच्या कामास सुरुवात करत असताना आधीपासूनच तेथे रहावयास असलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन केले नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना संतप्त महिलांनी घेराव घातला. यावेळी झालेल्या गडबडीत महिलांनी लहान बाळाला थेट पालकमंत्र्यांच्या पायावर ठेवल्याने गोंधळ उडाला. यावेळी कारवाई थांबविण्याच्या सूचना देत पुनर्वसनाचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. जत शहरात उद्यानाचे काम सुरू करण्यात आले असून, हे काम सुरू करत असताना याठिकाणी पूर्वी राहण्यास असणाऱ्या कुटुंबांची घरे हटविण्यात येत आहेत. मात्र, आमचा उद्यानास विरोध नसून, अगोदर आमचे पुनर्वसन करावे मगच काम करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पुरुष व महिला मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आल्या होत्या. नियोजन समितीची बैठक संपवून पालकमंत्री पाटील हे वाहनाजवळ येताच या महिलांनी घेराव घालत मागण्या मांडल्या. या गडबडीत काही महिलांनी लहान मुलाला थेट पालकमंत्र्यांच्या पायावरच ठेवल्याने गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत केले. यावेळी पालकमंत्र्यांनी कारवाई थांबविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा निघून गेला. कुटुंबांचे अन्य जागेत पुनर्वसन केल्याशिवाय उद्यानाचे काम सुरू करू नये तसेच पालकमंत्र्यांचे जत तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच घेराव घातल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी जत तालुक्याला भेट देण्याची विनंती करणारे निवेदन अ‍ॅड. प्रभाकर जाधव व इतरांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. यावर लवकरच जत तालुक्याचा दौरा करून समस्या जाणून घेणार असून, प्रसंगी जतमध्ये मुक्काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बसवराज पाटील, चंद्रशेखर रेबगोंड, दिनेश साळुंखे, प्रवीण यादव, अजित पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)