शरद जाधव।प्रश्न : ‘धर्मादाय’च्या माध्यमातून विधायक उपक्रमांना प्रेरणा कशी मिळाली?उत्तर : जिल्ह्यातील २३ हजारावर संस्थांची नोंदणी व इतर कामकाज धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत चालत असते. या संस्थांच्या नोंदणीवेळी सादर केलेला उद्देश काहीसा बाजूला पडलेला असतो. त्यामुळे विश्वस्तांच्या मदतीने जिल्हाभर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यास प्रतिसादही चांगला मिळतो आहे.
प्रश्न : चारा दान केंद्राची संकल्पना कशी लक्षात आली?उत्तर : दुष्काळी उपाययोजनांवर शासनातर्फे काम सुरू असले तरी, आपल्या विभागामार्फतही काम व्हावे, असे वाटल्यानेच समाजसेवी संस्थांच्या मदतीने जांभुळणी (ता. आटपाडी) येथे चारा दान केंद्र सुरू करण्यात आले आहे. मान्सून सक्रिय होईपर्यंत हे केंद्र सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी हे आदर्शवत ठरत आहे. याठिकाणी साडेतीनशेवर जनावरांच्या चाऱ्याची सोय झाली आहे.
प्रश्न : कार्यालयाचे कोणते कामकाज अधिक प्रभावीपणे झाले?उत्तर : यावर्षी जिल्ह्यातील ४८२५ गणेशोत्सव मंडळे व दुर्गामाता मंडळांना आॅनलाईन पध्दतीने परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाचला असून, कार्यालयात होणारी गर्दीही झाली नाही. कार्यालयाचे संपूर्ण काम आॅनलाईन करण्याची मोहीम सुरू असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात असणाºया २७ हजारावर संस्थांना आपले लेखा अहवाल आॅनलाईन सादर करता येत आहेत. प्रत्येक उपक्रमासाठी सरकारवर अवलंबून न राहता, जनतेचा सहभाग व संस्थांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहेत.वृक्ष लागवडीस प्राधान्यजनावरांच्या चाºयाची सोय करण्याबरोबरच जूनमध्ये वृक्ष लागवडीचाही उपक्रम हाती घेणार आहे. जत तालुक्यातील देवस्थाननी यात सहभाग घेण्याचे ठरविले आहे. यासह इतर भागातही वृक्ष लागवडीस संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. भिलवडीत चितळे उद्योग समूहाच्यावतीनेही वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येत आहे. यात पोलीस प्रशासनाचेही सहकार्य घेणार आहे.शहरातील स्वच्छतेवर काम सुरूजिल्ह्यात उपक्रम राबविण्याबरोबरच आता लवकरच शहरात स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असली तरी, त्यांच्याकडील मनुष्यबळाच्या अडचणीमुळे शहरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था व इतर सर्वच संस्थांच्या मदतीने धर्मादाय उपायुक्त कार्यालयाच्यावतीने शहरात प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून विश्वस्तांना विश्वासात घेऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. - सुवर्णा खंडेलवाल-जोशी