कवठेमहांकाळ : काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागा. पाहिजे ती ताकद कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी करू, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
मुंबई येथे कवठेमहांकाळचे नूतन तालुकाध्यक्ष संजय हजारे यांच्यासह राज्य सदस्य माणिकराव भोसले व पदाधिकारी यांनी मंगळवारी पटोले यांची भेट घेतली. यावेळी पटोले यांनी हजारे यांचा सत्कार केला. यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत, धनाजी पाटील उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, राज्यात यापुढे सक्रिय तसेच कामाच्या कार्यकर्त्यांना संधी व न्याय देण्याची भूमिका आपण घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.
सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो परत मजबूत करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे. गट-तट विसरून एकजुटीने कामाला लागावे. आपण पूर्णपणे ताकद देऊ, कुठेही कमी पडणार नाही.