शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पैशाच्या तराजूत ‘भूमी अभिलेख’चे काम

By admin | Published: January 25, 2016 1:04 AM

तासगावातील प्रकार : खुलेआम होतेय लाचखोरी; हेलपाट्यांनी नागरिक त्रस्त

 दत्ता पाटील ल्ल तासगाव तासगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ‘भूमी अभिलेख’चे कार्यालय आहे. सहा महिन्यांपूर्वी येथील प्रशासकीय प्रमुख तथा उपअधीक्षक निवृत्त झाले. तेव्हापासून हा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती राहिला. त्यांच्या काळात कामात पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वच कारभार पैशाच्या तराजूत सुरू असल्याचे गाऱ्हाणे येथे हेलपाटे मारणाऱ्या सामान्यांतून मांडले जात होते. कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत टेबलाखालून (प्रत्यक्षात टेबलावरूनच) ‘व्यवहार’ केल्याशिवाय कामाची कोणतीच फाईल पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. येथे एखादे काम घेऊन आलेल्या नागरिकाला, त्याने एक-दोन हेलपाटे मारल्यानंतर काम अवघड असल्याचे यंत्रणेकडून भासवण्यात येते. नंतर संबंधित काम मार्गी लावण्यासाठी पैशाची मागणी होते. खालच्या कर्मचाऱ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत फाईल पुढे सरकवण्यासाठी तीन टेबलांवर खुलेआम आर्थिक व्यवहार केले जात असल्याचे चित्र आहे. कामासाठी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास अथवा नियमांची विचारणा केल्यास संबंधित नागरिकाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सहन करण्याशिवाय पर्यायच नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे नागरिकांना पैसे मोजल्याशिवाय काम होत नसल्याचा अनुभव आहे. नागरिकांतून तक्रारी होत असलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी नुकताच कार्यभार सोडला आहे. त्यामुळे नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांच्या काळात तरी पारदर्शी कारभार होईल, अशी अपेक्षा आहेच. मात्र बेलगाम आणि भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी येथील नागरिकांची भावना आहे. (पूर्वार्ध) लाचेकरिता शिफारस भूमी अभिलेख कार्यालयातील काम मार्गी लावण्यासाठी सुरुवातीला कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून साहेबांना भेटा, असे सुचवण्यात येते. त्यानंतर संबंधित व्यक्ती साहेबांना भेटल्यानंतर साहेबांकडून संबंधित व्यक्तीचा अंदाज घेऊन खुलेआम पैशाची मागणी केली जाते. या साहेबांना पैसे दिल्यानंतर पुन्हा खालच्या साहेबाला भेटण्याची सूचना होते. दोन नंबरच्या साहेबाला पैसे दिल्यानंतर, या साहेबाकडून प्रत्यक्ष फाईल तयार केलेल्या कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देण्याची सूचना केली जाते. मागील सहा महिन्यांत अशा पध्दतीचा अनुभव अनेकांना आला आहे. बिगरशेतीसाठी असा आला अनुभव काही महिन्यांपूर्वी बस्तवडे (ता. तासगाव) येथील एका लाभार्थ्याने बिगरशेतीसाठी प्रस्ताव सादर केला होता. बिगरशेतीची परवानगी मिळण्यापूर्वी भूमी अभिलेख आणि नगररचना कार्यालयाकडून कमी-जास्त पत्रकाची (कजाप) मंजुरी घेण्यासाठी या कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागले. हे पत्रक मंजूर करण्यापूर्वी प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधित लाभार्थ्यास मिरजेतील कार्यालयात बोलावून घेतले. ‘या कामासाठी पंचवीस हजारांचा दर आहे. तुमच्यासाठी हे काम दहा हजारांत करतो’, असे सांगितले. या लाभार्थ्याने त्यावेळी प्रभारी अधिकाऱ्यांना चार हजार रुपये दिले. यापेक्षा जास्त रक्कम देण्याची कुवत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा या साहेबांच्या सूचनेनुसार कार्यालयीन प्रमुख अधिकाऱ्यास दोन हजार रुपये मोजावे लागले. पुन्हा पुढच्या हेलपाट्यावेळी प्रभारी साहेबांनी अडीच हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी या साहेबांना पाचशे रुपये दिले. या साहेबांची सही झाल्यानंतर फाईल हातात आली. त्यावेळी ही फाईल तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याला तीन हजार रुपये द्यावे लागले. विशेष म्हणजे या तिघांनीही प्रत्येकवेळी खुलेआम न लाजता टेबलवरूनच पैसे घेतले. अशा पध्दतीने एका कामासाठी आठ-दहा हेलपाटे मारावे लागल्यानंतर आणि तब्बल साडेनऊ हजार रुपये मोजल्यानंतर एक काम यातून मार्गी लागले.