कणकवली : नागेश्वर कला , क्रीडा मंडळ हे कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. कणकवली नगरपंचायतीचे सहकार्य या मंडळाला नेहमीच असेल. येथे आलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी चांगला खेळ करावा. स्पर्धेत एकच संघ विजयी होत असतो. त्यामुळे कोणीही नाराज न होता खेळात सातत्य ठेवा़वे. कणकवलीत आता अद्ययावत क्रीडांगण व उद्यान होणार असून खेळाडूंना त्यामुळे एक व्यासपिठ मिळेल. असे प्रतिपादन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.कणकवली टेंबवाडी येथे नागेश्वर कला, क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, माजी नगरसेवक अभय राणे, महेश सावंत, पत्रकार सुधीर राणे, दीपक बागवे, सुभाष पालव, सत्यवान राणे, संतोष राणे, संजय सावंत, बयाजी बुराण , दीपक बागवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते .या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या मैदानाचा शुभारंभ श्रीफळ वाढळून भगवान लोके यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आली. हा सामना यंगस्टार' ब ' विरूध्द पाटेश्वर कुडाळ या दोन संघात झाला. या स्पर्धेला जिल्ह्यातील नामवंत संघांनी हजेरी लावली होती़. संपुर्ण प्रकाश झोतात ही कबड्डी स्पर्धा खेळविण्यात आली.ही कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित मांडवकर, सागर राणे, ललित राणे, प्रथम सावंत, रूपेश साळुंखे, पंकज बागवे, निखील बागवे, यश पालव, सुनिल सावंत, कलिंगण, प्रमोद सावंत, व्यंकटेश सावंत, आप्पा चव्हाण, अभि चव्हाण, स्वप्निल डिचोलकर, रूपेश वाळके, शिवलिंग पाटील, सुनिल तेली आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.
नागेश्वर कला क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद ! - समीर नलावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 5:17 PM
या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या मैदानाचा शुभारंभ श्रीफळ वाढळून भगवान लोके यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आली. हा सामना यंगस्टार' ब ' विरूध्द पाटेश्वर कुडाळ या दोन संघात झाला
ठळक मुद्देकणकवलीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ; नामवंत संघांचा सहभाग