लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळ्याचे साई चॅरिटेबल ट्रस्ट हे सामाजिक भान जपणारी संस्था आहे, त्यांचे काम काैतुकास्पद आहे, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
येथील साई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मोफत रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप शिराळा पोलीस ठाणे व तहसील कार्यालयामध्ये करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होत.
साई चॅरिटेबलचे डॉ. शैलेश माने यांच्याहस्ते या गोळ्यांचे वाटप केले. डॉ. शैलेश माने म्हणाले, कोरोनाचा पुन्हा झालेला शिरकाव रोखण्यासाठी तसेच आपल्या जनतेचे रक्षण करणारे महसूल विभाग व पोलीस बांधव यांना सेवा बजावावी लागते. अशा परिस्थितीमध्ये या कर्मचारी बांधवांची तब्येत चांगली राहावी यासाठी साई चॅरिटेबल ट्रस्टने हा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वीही साई चॅरिटेबल ट्रस्टने भरपूर समाजउपयोगी उपक्रम केले आहेत.
यावेळी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील, नायब तहसीलदार व्ही. डी. महाजन, नायब तहसीलदार अरुण कोकाटे व कर्मचारी उपस्थित होते.